-
'सुलतान' या आगामी चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा उपस्थित होते. (छाया- वरिन्द्र चावला)
-
यावेळी दोघांनी चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान एकमेकांना आलेल्या अडचणींची मोकळेपणाने कबुली दिली. लंगोट परिधान करून अनुष्कासोबत चित्रीकरण करताना खूप अडचण आल्याचे सलमान खानने यावेळी सांगितले. (छाया- वरिन्द्र चावला)
-
माझी शरीरयष्टी कुस्तीपटूसारखी नसल्यामुळे मला चित्रपट करताना खूप भीती वाटत असल्याचे अनुष्काने यावेळी सांगितले. (छाया- वरिन्द्र चावला)
-
'सुलतान'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सलमान, सलमान आणि फक्त सलमान हे गणित सलमानच्या याही चित्रपटात कायम असल्याचे ट्रेलरवरून दिसते. (छाया- वरिन्द्र चावला)
-
पैलवानाचे रांगडे व्यक्तीमत्व, हरियाणवी भाषा, मिशांना ताव देणारा सलमान आणि लक्षवेधी संवादांनी भरलेला ट्रेलर रोमांच वाढवणारा आहे. (छाया- वरिन्द्र चावला)
-
-
अभिनेत्री अनुष्का शर्माने चित्रपटात महिला कुस्तीपटूची भूमिका साकारली आहे. हरियाणातल्या कुस्तीपटूचा ऑलिम्पिक ते बॉक्सिंग पर्यंतचा प्रवास ट्रेलरमध्ये पाहायला मिळत असून, धारधार संवाद चित्रपटाची उत्सुकता वाढवणारे आहेत. (छाया- वरिन्द्र चावला)
-
आपली ग्लॅमडॉलची ओळख पुसून अनुष्का आपल्याला एका नव्या रुपात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये अनुष्काची दोन रुपे पाहावयास मिळतात. (छाया- वरिन्द्र चावला)
-
अनुष्का या चित्रपटात आरफा या कुस्तीपटूची भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी अनुष्काला कुस्तीचा धोबीपछाड हा डाव शिकण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली होती. (छाया- वरिन्द्र चावला)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल