-
मराठी चित्रपटसृष्टीसह बॉलीवूडलाही ‘याड लावलेल्या’ दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या ‘सैराट’ चित्रपटाच्या टीमने हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय असलेल्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये रविवारी उपस्थिती लावली. यावेळी आर्ची, परशा, सल्या, लंगड्या हे सैराटमधील कलाकार भलतेच खूश आणि उत्साही दिसले. (छाया सौजन्यः ट्विटर)
-
कपिलच्या शोमध्ये हजेरी लावल्यानंतर सैराटचा दिग्दर्शक नागराज म्हणाला की, मागे एकदा हिंदीतील सुपरस्टार किंग खान म्हणजेच शाहरुख चला हवा येऊ द्या या मराठी शोच्या मंचावर आला होता. आज आम्ही कपिल शर्माच्या शोमध्ये आलोय. हे साटंलोटं चांगल चाललंय. मराठी त्याही अर्थाने अपग्रेड होतोय की शाहरुख खान चला हवा येऊ द्या सारख्य रिजनल शोमध्ये येतो. तसेच, एक रिजनल चित्रपट देशभरात प्रसिद्ध असलेल्या शोमध्ये जातो ही आनंदाची गोष्ट आहे.
-
रिंकू राजगुरू म्हणाली की,’ कपिलला याआधी फक्त टीव्हीवर पाहायचो. पण आज आम्ही प्रत्यक्षात त्याला भेटून छान वाटलं. इथे येऊन आम्ही खूप धम्माल केली आणि आम्ही खूप हसलोय.
-
आकाश ठोसर म्हणाला की, पहिल्यांदाच एखाद्या मराठी चित्रपटाने कपिलच्या शोमध्ये हजेरी लावलीयं. मला याचा खूप अभिमान वाटतोय. आधी मला भीती वाटत होती की इतक्या मोठ्या शोच्या मंचावर जायचं आहे. पण आम्ही शोमध्ये खूप धम्माल केली. सगळे आमच्यासोबत गाण्यावर नाचले.
-
तानाजी गालगुंडे म्हणाला की, सैराटमध्ये काम करेन हेच कधी वाटलं नव्हतं. त्यामुळे कपिलच्या शोमध्ये येण्याची गोष्ट तर दूरच. त्याच्या शोमध्ये हजेरी लावली यावर विश्वासच बसत नाही’, असे सांगितले.
-
अरबाझ म्हणाला की, कपिलच्या शोमध्ये येऊन भारी वाटलं. त्यांच्या प्रत्येक गोष्टीत विनोद असतो. ते नंतर कळतं पण त्यामुळे बरीच धम्माल उडते.

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य