-
अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि दिग्दर्शक केदार शिंदे या जोडीने आत्तापर्यंत अनेक गाजलेली नाटके मराठी रंगभूमीवर आणलीत. नुकतेच 'गेला उडत' हे केदार शिंदे लिखित दिग्दर्शित नाटक रंगभूमीवर आलेयं. या नाटकामध्ये सिद्धार्थ जाधवने एका सुपर मॅनची भूमिका साकारलीयं. पण ख-या आयुष्यातही सिद्धार्थ आपल्या दोन्ही लेकींसाठी सुपरहिरोपेक्षा कमी नाही. कलाकारांचं जीवन किती धावपळीचं असतं हे काही विशेष सांगायला नको. कामाच्या व्यापातून आपल्या कुटुंबासाठी ते वेळ काढतात. त्यातच आजचा दिवस तर सिद्धार्थसाठी विशेष म्हत्त्वाचा आहे. आज त्याची छोटी मुलगी इरा हिचा आज पहिला वाढदिवस आहे. (छाया सौजन्यः सिद्धार्थ जाधव फेसबुक)
-
आपल्या छोट्या मुलीच्या पहिल्या वाढदिवशी भावूक झालेल्या सिद्धार्थने दोन्ही लेकींचे फोटो फेसबुकवर शेअर केले. इतकेच नाही तर त्यासोबत त्याने एक हृदयस्पर्शी पोस्टही केली आहे. पुढे बघा काय म्हणाला सिद्धार्थ..
-
जून महिना माझ्यासाठी तसा खासच आहे.. आणि त्यात ६ जून आणि २५ जून तर .. जीव की प्राण… कारणही तसंच.. माझा "जीव" असलेली माझी छोटी मुलगी "इरा" हीचा आज पहीला वाढदिवस…६ जून…. बघता बघता एक वर्ष झाल सुद्धा… आणि माझा "प्राण" माझी मोठी मुलगी "स्वरा" हीचा ५ वा वाढदिवस.. २५ जून.. याच महिन्यातला….
-
माझी आई… माझी बायको… माझी बहीण… यांनी आजपर्यंत मला खुप सांभाळून घेतलं.. तसंच या माझ्या दोन्ही मुली मला खुपच सांभाळून घेतात… माझ्या तृप्तीचं तर स्पष्ट मत आहे की मी या दोघींपेक्षाही खूप लहान आहे.. एवढी मस्ती आम्ही तिघं करत असतो.. पण तृप्तीचंही कौतुक.. आम्हा तिघांना खुप सांभाळून घेते..
-
माझे आईवडील माझ्या आयुष्यातले खरे "SUPERHERO" आहेत…. पण इरा आणि स्वरा माझ्या आयुष्यातल्या माझ्या SUPERPOWERS आहेत… या दोघींमुळेच नविन ENERGY मिळाली काम करायला.. आयुष्यभर तुमचा लहान भाऊ म्हणूनच राहणार… इरा आणि स्वरा.. तुम्हा दोघांनाही वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा..
-
तुमचा बाबा .. SORRY SORRY… तुमचा छोटा भाऊ.. सिद्धू

७०० नक्षलवाद्यांना दहा हजार पोलिसांनी घेरले; ७ नक्षल ठार; पत्रक काढणे नक्षलवाद्यांच्या अंगलट; चकमक सुरूच