-
अलिकडील काळात मराठीमध्ये दर्जेदार चित्रपटांची निर्मिती होत आहे. नागराज मंजुळेच्या सैराटने तर रेकॉर्डचा डोंगरच रचला. त्यामुळे सातासमुद्रापार पोहोचलेल्या ‘सैराट’चे प्रमोशन करण्याचा मोह कपिल शर्मालाही आवरला नाही. कपिलच्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये ‘सैराट’च्या प्रमोशनचे चित्रिकरण झाले.
-
द कपील शर्मा शो'मध्ये पहिल्यांदाच मराठी चित्रपटाचे कलाकार पोहोचले आणि इतिहास घडवला.
-
'द कपिल शर्मा शो'मध्ये पहिल्यांदाच मराठी चित्रपटाचे कलाकार पोहोचले आणि इतिहास घडवला. आजपर्यंत कपील शर्मा शोमध्ये केवळ बॉलिवूड चित्रपटांचेच प्रमोशन होत होते. पण पहिल्यांदाच कपिल शर्माने नागराज मंजुळेंच्या सैराट या मराठी चित्रपटाच्या टीमला शोमध्ये येण्याचे आमंत्रण दिले.
-
कपिलच्या शोमध्ये आपल्या आवाजाने सर्वांना याडं लावून टाकणारे संगीतकार अजय-अतुल
-
अजय-अतुलने त्यांच्या गाण्यांनी सर्वांना झिंगाट करून सोडले
-
सैराटच्या गाण्यावर ठेका धरताना चित्रपटातील कलाकार.
-
सैराटच्या गाण्यावर कपिलनेही झिंगाट डान्स केला.
-
अलिकडे चला हवा येऊ द्यामध्ये शाहरुख खान आला होता. त्यानंतर आता सैराटची टीम द कपिल शर्मा शो या हिंदी भाषिक कार्यक्रमात पोहचल्याने चांगल साटंलोटं सुरु आहे अशी प्रतिक्रिया दिग्दर्शक नागराज मंजुळेने दिली.
-
सैराटच्या टीमशी गप्पा मारताना कपिल शर्मा.
-
सैराटची टीम
-
दिग्दर्शक नागराज मंजुळे, आकाश ठोसर, रिंकु राजगुरु, संगीतकार अजय – अतुल आणि आर्ची – परशाचे मित्र प्रदिप आणि सल्या हे कपिल शर्मा शोमध्ये सहभागी झाले होते.
-
फोटोसाठी पोज देताना द कपिल शर्मा शोच्या टीमसह नागराजची टीम.
-
सैराटच्या कलाकारांचा हा झिंगाट एपिसोड लवकरच सोनी टीव्हीवर प्रसारित होईल.
-
कपिलच्या शोमध्ये खूप धम्माल आल्याची प्रतिक्रिया रिंकू आणि आकाशने दिली.
-
आकाश आणि रिंकूशी गप्पा मारताना कपिल शर्मा.
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”