-
सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह असताना सेलिब्रिटीही त्यापासून दूर नाहीत. कामातून वेळ काढत, कोणी कुटुंबाची परंपरा जपत आपापल्या परीने बाप्पाची मनोभावे पूजा करत आहेत.
-
बाप्पाची मनोभावे पूजा करणाऱ्या सेलिब्रिटींमधील एक नाव म्हणजे 'लव्ह लग्न लोचा' फेम अभिनेत्री अक्षया गुरव. अक्षयानेही मोठ्या उत्साहात बाप्पांची प्रतिष्ठापना केली होती.
-
तिच्या माहेरी अनंत चतुर्दशीपर्यंत बाप्पा विराजमान असतात.
-
यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच ती गणेशोत्सवाची धूम तिला अनुभवता आली नाहीये. याबद्दलची रुखरुख मनात असली तरीही तो आनंद तिला सासरी मिळाला आहे.
-
अक्षयाच्या सासरी दीड दिवसांच्या बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. मोठ्या उत्साहात आणि मनोभावे तिने सहकुटुंब बाप्पाची पूजा केली.

४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी