-
दिग्गज अभिनेता रविंद्र महाजनी यांचा मुलगा आणि अभिनेता गश्मीर महाजनी याच्या घरी गणपतीचे पाच दिवसांसाठी आगमन होते.
-
आईच्या हातचे उकडीचे मोदक खायला माझी मित्रमंडळी येतात. पण मला मात्र उकडीचे मोदक अजिबात आवडत नाहीत. त्यामुळे मी बाकीच्या स्वादिष्ट भोजनावर ताव मारतो, असेही गश्मीर म्हणाला.
-
गश्मीर म्हणतो की, माझ्या आजोबांपासून आमच्या घरी गणपती बाप्पाचे पाच दिवसांसाठी आगमन होते. आमच्या घरी इको-फ्रेंडली गणेशोत्सव साजरा होतो. साधेचं डेकोरेशन करण्यावर आमचा भर असतो.
-
माझी डान्स अकॅडमी सुरू झाल्यापासून माझे विद्यार्थी गणेशोत्सवाच्या काळात आवर्जून घरी येतात आणि त्यामुळे घर अगदी भरलेलं असतं, असे गश्मीर म्हणाला.
-
कितीही काम असलं तरीही गश्मीर गणेशोत्सवाच्या काळात घरीच सुट्टी घेऊन राहण्यावर भर देतो. गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करणं, आणि त्याचे षोडशोपचारे पूजन करणं त्याला खूप आवडते.

४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी