-
रेखा… चित्रपटसृष्टीत सौंदर्यवतींच्या नावांच्या यादीतील एक महत्त्वाचं नाव. त्या सहसा जास्त कार्यक्रमांना जात नाहीत. पण, जेव्हा जेव्हा त्या एखाद्या कार्यक्रमाला हजेरी लावतात तेव्हा मात्र त्यांच्यावरच अनेकांच्या नजरा खिळतात. (छाया सौजन्य- Varinder Chawla/ Instagram)
-
'यो के हुआ ब्रो' या वेब सीरिजच्या स्पेशल स्क्रीनिंगमध्येही असंच काहीसं दृश्य पाहायला मिळालं. अपारशक्ती खुराना, शमिता शेट्टी, शिल्पा शेट्टी या सर्व कलाकारांची उपस्थिती असतानाही कॅमेऱ्यांची नजर खिळली ती रेखा यांच्या चिरतरुण सौंदर्यावर. या कार्यक्रमावेळी त्यांची वेगळी स्टाईल स्टेटमेंटही पाहायला मिळाली. (छाया सौजन्य- Varinder Chawla/ Instagram)
-
बिपाशा बासूनेसुद्धा रेख्या यांच्यासोबत फोटोसाठी पोझ दिली. (छाया सौजन्य- Varinder Chawla/ Instagram )
-
'शेट्टी सिस्टर्स', शमिता आणि शिल्पा शेट्टी. (छाया सौजन्य- Varinder Chawla/ Instagram)
-
यावेळी शिल्पा शेट्टीची आईसुद्धा हजर होती. (छाया सौजन्य- Varinder Chawla/ Instagram)
-
'यो के हुआ ब्रो'च्या स्क्रीनिंगसाठी रेखा यांचं स्वागत करण्यासाठी खुद्द शमिता शेट्टी गेल्याचं पाहायला मिळालं. (छाया सौजन्य- Varinder Chawla/ Instagram)
-
या वेब सीरिजमध्ये टिव्ही होस्ट अपारशक्ती खुराना हरयाणवी युवकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. याआधी 'दंगल' चित्रपटात त्याचा हरयाणवी अंदाज पाहायला मिळाला होता. (छाया सौजन्य- Varinder Chawla/ Instagram)

४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी