-
आपल्या मनातील कामना पूर्ण व्हाव्यात म्हणून कित्येक भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनाला येतात आणि त्याच्या चरणी इच्छापूर्तीसाठी साकडं घालतात. बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मीनेही लालाबागच्या राजाला 'बादशाहो' चित्रपटाच्या यशासाठी साकडं घातलं आहे.
-
यावेळी चित्रपटाच्या वितरण व्यवस्थापक संगीता अहिरदेखील त्याच्यासोबत होत्या.
-
आणीबाणीच्या काळावर आधारित असलेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी १२.०३ कोटी रुपयांची कमाई केल्याचे ट्विट व्यापार विश्लेषक आणि चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी केलेय.
-
अजय देवगण, इम्रान हाश्मी, इषा गुप्ता, इलियाना डीक्रूझ, विद्युत जामवाल आणि संजय मिश्रा यांसारखी तगडी स्टारकास्ट असलेल्या ‘बादशाहो’ ची निर्मिती भूषण कुमार आणि मीलन लुथारिया यांनी केलीये.
-
अजय आणि इम्रानची जोडी तिसऱ्यांदा रुपेरी पडद्यावर एकत्र पाहावयास मिळतेय. याआधी त्यांनी ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ आणि ‘दिल तो बच्चा है जी’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलेले.

४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी