-
टेलिव्हिजन विश्वामध्ये लोकप्रिय आणि टीआरपी रेटिंगमध्ये बराच काळ अग्रस्थानी असणारी मालिका म्हणजे ‘दीया और बाती हम’. या मालिकेतील सूरज आणि संध्याच्या व्यक्तिरेखांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. यामध्ये सूरज राठीची भूमिका साकारलेल्या अभिनेता अनस रशिदने एका नव्या नात्याची सुरुवात केली आहे.
-
हीना इक्बाल हिच्यासोबत अनस विवाहबद्ध झाला असून, सहजीवनाच्या नव्या प्रवासाला त्याने सुरुवात केली आहे.
-
पंजाबच्या मलेरकोटा येथे पारंपरिक मुस्लिम पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला.
-
अनसच्या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यांचे हे फोटो पाहून अनसची रिअल लाइफ संध्या सर्वांचीच मनं जिंकतेय असं म्हणायला हरकत नाही.
-
हीना चंदीगडमध्ये नोकरी करत असून, लवकरच ती अनससोबत मुंबईत येणार आहे.
-
मुख्य म्हणजे ती अनसपेक्षा १४ वर्षांनी लहान आहे. पण, आम्हा दोघांमध्ये असणाऱ्या वयाच्या अंतराला ती फारसं महत्त्वं देत नाही असं अनसने एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं.

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ