-
राजकुमार रावची मुख्य भूमिका असणाऱ्या 'न्यूटन' या चित्रपटाची २०१८ मध्ये पार पडणाऱ्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यांच्या शर्यतीत निवड झाली आहे. चित्रपटाच्या वाट्याला यश येताच आणखी काही वाटा फुटतात आणि चर्चा सुरु होते ती म्हणजे त्याच्याशी निगडीत काही वादांची. न्यूटनच्या बाबतीतही अशीच एक चर्चा समोर आली आहे. न्यूटन हा चित्रपट एका इराणी चित्रपटाची 'कॉपी' असल्याचं म्हटलं जात आहे. आता हे वृत्त कितपत खरं हे तर फक्त चित्रपटाचा दिग्दर्शकच सांगू शकेल. पण, ऑस्करसाठी भारतातून निवड झालेल्या इतरही काही चित्रपटांच्या बाबतीच असेच काही चर्चा रंगल्या होत्या. चला नजर टाकूया या चर्चांवर…
-
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित भव्य 'देवदास' या चित्रपटातूनही भव्यता झळकली होती. या चित्रपटाचं नावही बरंच चर्चेत आलं. पण, मणिरत्नम दिग्दर्शित आणि आर. माधवन अभिनीत 'कन्नथिल मुथामित्तल'चा विषय, कथानक आणि कलाकारांची कामगिरी पाहता या चित्रपटाकडे ऑस्करसाठीची चांगली चांगली संधी होती.
-
तामिळ चित्रपट 'जीन्स'ने अनेकांचच लक्ष वेधलं होतं. एस. शंकर दिग्दर्शित या चित्रपटाने त्या वर्षी ऑस्करच्या शर्यतीतही बाजी मारली होती. त्या वर्षी 'सत्या' आणि 'जीन्स' या दोन्ही चित्रपटांमध्ये बरीच तुलनाही करण्यात आली होती.
-
२००५ मध्ये 'पहेली' या चित्रपटाचं नाव ऑस्करसाठी पुढे करण्यात आलं तेव्हाही अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. कारण, त्याच वर्षी भन्साळींचा 'ब्लॅक' हा चित्रपटसुद्धा प्रदर्शित झाला होता. हे दोन्ही चित्रपट अगदी तोडीस तोड असेच होते.
-
बॉलिवूडमध्ये एकाच वर्षी दर्जेदार चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे त्यानंतर उद्भवलेली परिस्थिती अनेकदा पाहायला मिळाली आहे. २०१२ मध्येही अशीच परिस्थीती पाहायला मिळाली होती. 'बर्फी', गँग्स ऑफ वासेपूर' आणि 'पान सिंग तोमर' हे तगडे चित्रपट या वर्षी प्रदर्शित झाले. पण, अखेरचा निर्णय 'बर्फी'च्या बाजूने देण्यात आला. त्यामुळे उर्वरित दोन चित्रपटांच्या टीमची निराशा झाल्याचं पाहायला मिळालं होतं.
-
फक्त हिंदीच नाही तर विविध भाषांमधील चित्रपटांच्या ऑस्कर एन्ट्रीविषयीसुद्धा असे वाद पाहायला मिळाले होते. त्यातीलच एक नाव म्हणजे 'द गुड रोड' हा गुजराती चित्रपट. इरफान खानच्या मुख्य भूमिका असणाऱ्या 'लंच बॉक्स' या चित्रपटाऐवजी या गुजराती चित्रपटाची निवड करण्यात आली होती.
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ