-
आपल्या सुरेल आवाजाने असंख्य श्रोत्यांच्या मनावर छाप पाडणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या मेणाच्या पुतळ्याचं नुकतंच अनावरण करण्यात आलं. दिल्लीच्या मादाम तुसाँ संग्रहालयामध्ये त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. (छाया सौजन्य- Tashi Tobgyal)
-
पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यावेळी खुद्द आशाताईसुद्धा त्या ठिकाणी हजर होत्या. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्याजोगा होता. (छाया सौजन्य- Tashi Tobgyal)
-
आपलीच प्रतिकृती असलेला मेणाचा पुतळा आशाताई मोठ्या कुतूहलाने न्याहाळत होत्या. त्यांनी यावेळी संग्रहालयाचे मनापासून आभारही मानले. (छाया सौजन्य- Tashi Tobgyal)
-
आशाताईंच्या मेणाच्या पुतळ्यात बरेच बारकावे टिपण्यात आले आहेत. व्यासपीठावर एखादं गाणं गाताना त्यांची उभी राहण्याची पद्धत आणि कायम त्यांच्या चेहऱ्यारवर असणारं स्मितहास्य या गोष्टींकडेसुद्धा पुतळा साकारताना लक्ष देण्यात आलं आहे. (छाया सौजन्य- Tashi Tobgyal)
-
दिमाखदार सोहळ्यात अनावरण झालेला हा मेणाचा पुतळा आता शाहरुख खान, करिना कपूर, कतरिना कैफ या बॉलिवूड सेलिब्रिटींच्या पुतळ्यांसोबत उभा करण्यात येणार आहे. (छाया सौजन्य- Tashi Tobgyal)
-
(छाया सौजन्य- Tashi Tobgyal)

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ