-
सलमान आणि त्याच्या बहिणीचं नातं सर्वांनाच ठाऊक आहे. त्यातही सलमानच्या बहिणीच्या म्हणजेच अर्पिताच्या लग्नानंतर तिच्याच घरी सर्व सण- उत्सव साजरा केले जात आहेत. खान कुटुंबाचा यंदाचा गणेशोत्सवही अर्पिता खान शर्माच्याच घरी साजरा करण्यात आला. त्यामागोमाग आता दिवाळीच्या पार्टीचं आयोजनही तिच्याच घरी करण्यात आलं होतं. अर्पिताच्या घरी आयोजित करण्यात आलेल्या या पार्टीसाठी खुद्द सलमानने इंडस्ट्रीतील त्याच्या मित्रमंडळींना आमंत्रित केलं होतं. त्यामुळे या पार्टीत कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. शुक्रवारी मोठ्या उत्साहात या पार्टीत कलाकारांनी कल्ला करत दिवाळीला दणक्यात सुरुवात केली.
-
अर्पिता खान शर्माने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन या 'दिवाळी बॅश'चे बरेच फोटो पोस्ट केले.
-
अभिनेत्री कतरिना कैफ, हुमा कुरेशीसुद्धा या पार्टीत बऱ्याच उत्साही दिसत होत्या.
-
या पार्टीत बऱ्याच सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
-
शाहरुख खान नेहमीप्रमाणेच सुरेख पठाणीमध्ये या पार्टीला आला होता.
-
लाल रंगाचा लेहंगा घातलेली कतरिना पार्टीत फार सुंदर दिसत होती.
-
'शेट्टी सिस्टर्स' म्हणजेच शिल्पा शेट्टी आणि शमिता शेट्टीनेसुद्धा पार्टीला हजेरी लावली होती.
-
कुटुंबप्रमुख सलीम खान, हेलन यांनी पार्टीची शोभा वाढवली.
-
अभिनेता सोहेल खानने यावेळी त्याच्या मुलांसोबत म्हणजेच योहान आणि निर्वानसोबत छायाचित्रकारांसमोर पोझ दिली.
-
यावेळी सलमानही त्याच्या पुतण्यांसोबत काही चर्चा करताना दिसला.
-
सफेद रंगाच्या हटके ड्रेसमध्ये करिष्मा कपूरचा लूक पाहण्याजोगा होता.
-
हुमा कुरेशी आणि तिचा भाऊ साकिब सलीम
-
रितेश देशमुख
-
दिया मिर्झा या पार्टीला पती साहिल सांघासोबत आली होती.

भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”