-
बॉलिवूड अभिनेता कुणाल कपूरचा आज ३८ वा वाढदिवस. १३ वर्षांच्या करिअरमध्ये त्याने अनेक लक्षवेधी भूमिका केल्या ज्यामुळे प्रेक्षकांच्या मनात त्याचे नाव कायमचे कोरले गेले. फक्त अभिनयच नाही तर त्याचे डिंपल आणि हॉटनेसचेही लाखों दिवाने आहेत. राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या रंग दे बसंती या सिनेमाने कुणालला खरी ओळख मिळवून दिली. कुणालनेही त्याची व्यक्तिरेखा उत्तम निभावली होती.
-
पण अभिनयाच्या पलीकडेही कुणालचं जग आहे. त्याला फिरायला फार आवडते. वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देणं त्याला आवडतं. सोशल मीडियावरील त्याचे फिरतानाचे फोटो पाहून याचा अंदाज तर सर्वांनाच येतो. तो उत्कृष्ट छायाचित्रकारही आहे. त्याला फोटो काढायला आवडत असले तरी त्याचे सेल्फीही तेवढेच सुंदर असतात. बॉलिवूड कलाकारांमध्ये सर्वांत सुंदर सेल्फी कोणाचे असतील असा प्रश्न विचारला तर त्यात कुणालचे नाव अग्रणी असेल यात काही शंका नाही.
-
कुणाल आपल्या फिटनेसकडेही तेवढेच लक्ष देतो. एक अभिनेता म्हणून सशक्त राहणं किती महत्त्वपूर्ण आहे याची जाणीव त्याला असल्यामुळे तो एकही दिवस व्यायाम केल्याशिवाय राहत नाही.
-
कुणाल एक आदर्श पती आहे. २०१५ मध्ये त्याचे नैना बच्चनशी लग्न झाले. त्याने नैनाच्या वाढदिवसाला तिच्यासाठी खास मेसेज लिहिला होता. त्याचा हा मेसेज कोणालाही त्याच्या प्रेमात पाडणारा असाच होता. जगातल्या सर्वात सुंदर व्यक्तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा. माझी बायको, माझी मैत्रीण, माझं प्रेम आणि माझा आधार. तुझ्याबरोबर असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू आपल्या प्रेमाने आणि आपुलकीने जिंकतेस. मी दिवसागणिक तुझ्या जास्तीत जास्त प्रेमात पडत आहे. उत्कृष्ट अभिनेता आणि माणूस कसा असावा यासाठी कुणालचे नाव नक्कीच पुढे करता येईल.
-
लवकरच तो अक्षय कुमारच्या गोल्ड सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे.
-
लोकसत्ता ऑनलाइन टीमकडून कुणाल कपूरला वाढदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा.

भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”