-
वय हा निव्वळ एक आकडा असतो, हे मलायका अरोराकडे पाहून कळते. आपल्या चित्रपटांनी आणि आयटम नंबर्सने या सुंदर आणि फिट असणाऱ्या अभिनेत्रीने सर्वांचे मनोरंजन केलेय. आज ही सौंदर्यवती ४४ वर्षांची झाली आहे.
-
तुम्हाला माहितीये का, मलायका एमटीव्ही इंडियाची व्हिजे राहिली आहे. जेव्हा एमटीव्ही इंडिया लाँच झाले होते तेव्हा ती व्हिजे म्हणून तेथे काम करत होती. त्यानंतर तिने अनेक कार्यक्रमांचे सहसूत्रसंचालनही केले.
-
केवळ 'छैय्या छैय्या'च नाही तर ९० च्या दशकातील अनेक गाण्यांमध्ये मलायका झळकली होती. 'गुर नाल इश्क मिठा', 'आयो रे मारो ढोल ना', 'प्यार के गीत' ही तिची काही प्रसिद्ध गाणी आहेत.
-
मलायकाने १९९८ साली अरबाज खानशी लग्न केले. एका कॉफी जाहिरातीच्या दरम्यान या दोघांची ओळख झाली आणि त्यानंतर त्याचे प्रेमात रुपांतर झाले.
-
मलायका आणि अरबाजला अरहान हा मुलगा आहे. पण, दुर्दैवाने या दोघांनी लग्नाच्या तब्बल १८ वर्षांनंतर एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
-
मलायकाचा हॉट अवतार पाहता ती एका मुलाची आहे असे अजिबात कळून येत नाही.
-
घटस्फोटानंतर मलायका आयुष्याचा पुरेपूर आनंद घेत असून, चाहत्यांना सोशल मीडियावरून तिचे आयुष्य आणि करिअर याची संपूर्ण माहिती देत असते.
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ