-
हिंदी चित्रपटसृष्टीत आजवर विविध विषयांवर भाष्य करणारे चित्रपट प्रदर्शित झाले. त्यातही काही चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. अशाच चित्रपटांच्या यादीतील एक चित्रपट म्हणजे 'कर्ज'. ऋषी कपूर, टिना मुनिम, सिमी गरेवाल, राज किरण, प्राण, मॅक मोहन यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाची गाणीसुद्धा विशेष गाजली होती. पार्श्वसंगीतापासून, ते प्रत्येक कलाकाराच्या भूमिकेमुळे 'कर्ज' खऱ्या अर्थाने यशस्वी चित्रपट ठरला होता. १९८० मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या यशात संगीतकार जोडी लक्ष्मीकांत- प्यारेलाल आणि गीतकार आनंद बक्षी यांचेही मोलाचे योगदान राहिले आहे. चला तर मग पुन्हा जाणून घेऊया या अफलातून चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी नेमके कसे वातावरण होते आणि कसा होता पडद्यामाचा 'कर्ज'… (छाया सौजन्य एक्स्प्रेस आर्काइव्ह, सोशल मीडिया)
-
प्राण यांना दृश्य समजवून सांगताना सुभाष घई.
-
'कर्ज' चित्रपटातील कलाकार मंडळी. एका मुलाखतीत सुभाष घई म्हणालेले की, कर्ज चित्रपट काळाच्या खूप पुढे असल्यामुळेच त्यावेळी तो समीक्षकांना फारसा भावला नाही. त्यामुळेच तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल पडला होता. पण, चित्रपट प्रदर्शित होऊन काही वर्षे उलटल्यानंतर क्लासिक चित्रपटांमध्ये त्याची गणना केली जाऊ लागली.
-
सिमी गरेवाल यांनी चित्रपटात कामिनी वर्माची भूमिका साकारली होती. त्यांच्या कामाची तेव्हा बरीच प्रशंसा झालेली.
-
सिमी गरेवाल, ऋषी कपूर आणि सुभाष घई
-
ऋषी कपूर आणि दिग्दर्शिक सुभाष घई गहन विषयावर चर्चा करताना.
-
'कर्ज' चित्रपटाच्या सेटवरील एक दुर्मिळ दृश्य
-
ऋषी कपूर आणि टीना मुनिम सायकल चालवताना.
-
'दर्दे-ए-दिल', 'ह हसिना थी' ही चित्रपटातील गाणी आजही संगीतप्रेमींच्या प्लेलिस्टचा भाग आहेत.
भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”