-
ज्येष्ठ गायिका गिरिजा देवी यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले आणि संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली. त्यांच्या निधनाची बातमी कळताच सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. गिरिजा देवी यांची कारकिर्द पाहता संगीत श्रेत्रात त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाचा अनेकांनाच हेवा वाटतो. त्यांच्या जाण्याने गिरिजापर्वाचाच अंत झाला असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
-
'ठुमरी' या गाण्याच्या प्रकारामध्ये गिरिजा देवी पारंगत होत्या. त्यांच्या बऱ्याच व्हिडिओ युट्यूबवर आजही चर्चेत आहेत. चित्रपटसृष्टीतील कलाकारांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंतच्या सर्व मंडळींमध्ये त्यांची उठबस होती. (छाया सौजन्य- एक्सप्रेस आर्काईव्ज फोटो)
-
नवी दिल्लीतील राजीव गांधी भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या संगीत महोत्सवातील शोभा गुर्टू आणि गिरिजा देवी यांची स्वरसाधना. (छाया सौजन्य- हेमंत चावला)
-
किशोरी अमोणकर आणि गिरिजा देवी. (छाया सौजन्य- रवींद्र बत्रा)
-
सवाई गंधर्व संगीत महोत्सवात सूर छेडताना गिरिजा देवी (छाया सौजन्य- पवन खेंग्रे)
-
एका पुरस्कार सोहळ्यात टिपलेले अभिनेते राजकुमार आणि गिरिजा देवी यांचे छायाचित्र (छाया सौजन्य- प्रवीण पांचाळ)
-
२२ जुलै, २०११ ला गिरिजा देवी यांना तत्कालीन उपराष्ट्रपती हामीद अन्सारी यांच्या हस्ते 'संगीत नाटक अकादमी पुरस्कार' देऊन गौरवण्यात आले होते. (छाया सौजन्य- प्रवीण जैन)

धनंजय मुंडेंचा राजीनामा येताच, एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर; भाजपा-राष्ट्रवादीविरोधात ११ नेत्यांची टीम तयार