-
नृत्य हे एक असे माध्यम आहे, ज्यामार्फत तुम्ही आपली भावना, कर्तृत्व, विचार लोकांपर्यंत पोहचवू शकता. नेमका याचाच आधार घेत जवळपास २५० अपंग मुलांनी बुधवारी मुंबईत आपल्या कलेचे सादरीकरण केले.
-
प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक शामक दावरच्या विक्टरी आर्ट फाऊंडेशन अंतर्गत भारतातील १२ हजार अपंग मुलांना नृत्याचे प्रशिक्षण दिले जाते. मुंबई तसेच मुंबई बाहेरील अनेक सामाजिक संस्थांमधील अपंग मुलांनाही शामक स्वत: नृत्याचे प्रशिक्षण देतो.
बुधवारी झालेल्या या कार्यक्रमात अपंग असलेल्या मुलांनी अगदी व्हिलचेअरवर बसून आपल्या कलेचे सादरीकरण केले. शुभम पेट्टी हा पायाने अपंग, ठेंगणा तसेच अनेक शारीरिक व्याधींनी ग्रस्त आहे. -
अद्भूत भारत ही थीम घेत यावर्षी या मुलांनी नृत्य सादर केले. या कार्यक्रमात मुलांसोबत त्यांच्या प्रशिक्षकांनीही परफॉर्मन्स दिले. या कार्यक्रमात काही मुलांनी आपली विशेष मोहोर उमटवली.
-
२३ वर्षीय शेहनवाझ शेख हा पायाने अपंग आहे. शामकच्या डान्स थेरपी क्लासेससाठी तो प्रशिक्षक म्हणून कामही करतो.
-
शहनवाझ व शुभम सारख्या अनेक मुलांनी एकत्रितपणे एकापेक्षा एक सादरीकरण यावेळी केले. डान्स नेहमीच थेरोपेटिक व व्यक्तिमत्त्व विकास करणारे माध्यम आहे असे यावेळी कोरिओग्राफर शामक दावरने सांगितले.
-
जिथे इच्छा तिथे मार्ग याची प्रचिती आणून देणारी ही मुलं खरंच सर्वांसाठी एक प्रेरणा आहेत.

धनंजय मुंडेंचा राजीनामा येताच, एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर; भाजपा-राष्ट्रवादीविरोधात ११ नेत्यांची टीम तयार