-
बॉलिवूडचा बादशहा, किंग खान या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता शाहरुख खानचा आज वाढदिवस. या खास दिवसानिमित्त अनेकांनीच त्याला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली असून, लोकसत्ता ऑनलाईन तुमच्यासाठी घेऊन आलंय शाहरुखच्या विविध चित्रपटांच्या सेटवरील काही खास फोटो. (छाया सौजन्य- एक्सप्रेस आर्काईव्ह्ज)
-
'राहुल…नाम तो सुना होगा' हे वाक्य गेल्या २५ वर्षांपासून विविध प्रकारे विविध कलाकारांनी सादर केलं. पण, शाहरुख खानने ज्या अंदाजात हा संवाद म्हणत अभिनेत्रींना घायाळ केलं त्याची बात काही औरच. (छाया सौजन्य- एक्सप्रेस आर्काईव्ह्ज)
-
शाहरुखविषयी काय आणि किती लिहावं हा प्रश्न नेहमीच अनेकांच्या मनात घर करतो. (छाया सौजन्य- एक्सप्रेस आर्काईव्ह्ज)
-
विविध चित्रपटांमध्ये त्याने साकारलेल्या भूमिका पाहता प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एकदा तरी किंग खानच्या कोणा एका भूमिकेशी आपले नाते जोडले आहे ही बाब नाकारता येणार नाही. (छाया सौजन्य- एक्सप्रेस आर्काईव्ह्ज)
-
त्याने साकारलेला 'राहुल', 'राज', 'कोच कबीर' अशी प्रत्येक भूमिका चित्रपटगृहातून बाहेर येणाऱ्या प्रेक्षकांना बरच काही देऊन गेली. (छाया सौजन्य- एक्सप्रेस आर्काईव्ह्ज)
-
मुलगा, प्रियकर, पती, मित्र अशी प्रत्येक भूमिका शाहरुखने तितक्याच ताकदीने निभावली. (छाया सौजन्य- एक्सप्रेस आर्काईव्ह्ज)
-
म्हणूनच कॅमेऱ्यासमोर आणि कॅमेऱ्यामागेही तो खऱ्या अर्थाने किंग ठरला. (छाया सौजन्य- एक्सप्रेस आर्काईव्ह्ज)
-
(छाया सौजन्य- एक्सप्रेस आर्काईव्ह्ज)
भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”