-
भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगमंचासाठी महत्त्वाचे नाव म्हणजे पृथ्वीराज कपूर. आज त्यांची १११वी जयंती. पृथ्वीराज यांनी अगदी मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केले असले तरी त्यांनी केलेले काम अजरामर असे आहे. त्यांची मुलं, नातवंडे आणि पतवंडेही याच क्षेत्रात कार्यरत असून, त्यांचा नावाचा वारसा पुढे नेत आहेत. कपूर कुटुंबामधील अभिनयाचा वारसा त्यांच्यापासूनच सुरु होतो.
-
मुघल-ए-आझम या १९६० साली आलेल्या चित्रपटातील अकबरच्या भूमिकेसाठी पृथ्वीराज यांना आजही नावाजले जातात.
-
पेशावर येथील थिएटरमधून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.
-
१९४४ साली प्रसिद्ध पृथ्वी थिएटरची स्थापना पृथ्वीराज कपूर यांनीच केली.
-
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासह पृथ्वीराज कपूर.
-
पृथ्वीराज यांना १९७२ साली दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
-
पृथ्वाराज कपूर यांच्या उजव्या बाजूला त्यांचा मुलगा राज कपूर आणि डाव्या बाजूला नातू रणधीर कपूर.
-
पृथ्वारीज यांचे कर्करोगाने २९ मे १९७२ रोजी निधन झाले.

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ