-
मराठी चित्रपटसृष्टी आणि टेलिव्हिजन विश्वातील कॉमेडी क्वीन निर्मिती सावंत यांचा मुलगा अभिनय याने त्याची मैत्रीण पूर्वा पंडित हिच्याशी काही दिवसांपूर्वीच लग्न केले. या लग्नाला अनेक मराठी सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
-
‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ मालिकेत नकटीच्या भावाची विनोदी भूमिका साकारणाऱ्या अभिनयने गेल्या आठवड्यात ११ डिसेंबरला पूर्वा पंडित हिच्याशी लग्न केले.
-
रेणूका शहाणे, शुभांगी गोखले आणि चिन्मयी सुमीत यांची सेल्फी मुमेण्ट
-
रेणुका शहाणे आणि तिचे पती आशुतोष राणा, शिल्पा तुळस्कर, सोनाली कुलकर्णी, प्राजक्ता माळी, सिद्धार्थ जाधव, भार्गवी चिरमुले, कविता लाड, वंदना गुप्ते, भारती आचरेकर, चिन्मयी सुमीत, जयवंत वाडकर, शुभांगी गोखले या कलाकार पाहुणे लग्नाला उपस्थित होते.
-
निर्मिती सावंत यांच्यासह कविता लाड, रेणूका शहाणे, सोनाली कुलकर्णी
-
अभिनयची ऑनस्क्रीन बहिण म्हणजेच प्राजक्ता माळीने लग्नातील सेल्फी शेअर करून नवदाम्पत्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
-
भार्गवी चिरमुले, अभिनय, पूर्वा
-
अभिनय आणि पूर्वा जवळपास १२ वर्षांपासून एकत्र होते. पूर्वासुद्धा अभिनेत्री असून ती रंगभूमीवर सक्रिय आहे. या दोघांच्या नव्या नात्यामुळे निर्मिती सावंत यांच्या कुटुंबात आणखी एका कलाकाराची भर पडली असे म्हणायला हरकत नाही.
-
नवदाम्पत्य पूर्वा आणि अभिनय
-
अभिनेता मयुरेश पेम, मनमीत पेमसुद्धा लग्नाला हजर होते.

‘याचा रोल किती हा बोलतो किती?’ संतोष जुवेकर अक्षय खन्नासंदर्भातील ट्रोलिंगबद्दल म्हणाला, “माझं नशीब…”