-
अभिनेता शाहरुख खान याच्या अलिबागमधील बंगल्याला आयकर विभागाने टाळे ठोकले आहे. शेतीसाठी विकत घेतलेल्या जमिनीवर शाहरुखने त्याचा आलिशान बंगला उभारला आहे. १९ हजार ९६० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडावर हा बंगला बांधण्यात आला आहे.
-
शाहरुखला खेळांची आवड असून आपल्या बंगल्यात त्याने मोठे फुटबॉल ग्राऊंड तयार केले आहे. पाच बंगल्यांना जेवढी जागा लागते तेवढ्या जागेत शाहरुखचा हा एक बंगला उभा राहिला आहे. या बंगल्यात जिम आणि स्विमिंग पुलही आहे.
शाहरुखने मोठा बंगला बांधण्यासाठी तो शेतकरी असल्याचे दाखवून जमीन विकत घेतल्याचाही त्याच्यावर आरोप करण्यात आला आहे. -
आपल्या कुटुंबियांबरोबर रिलॅक्स होण्यासाठी शाहरुखने हा बंगला घेतला आहे. सुट्यांचा आनंद घेण्यासाठी तो याठिकाणी जातोही. या बंगल्याचे इंटेरियर त्याची पत्नी गौरी खान हिने केले असल्याचेही समोर आले आहे.
-
या बंगल्यात हेलिपॅडही उभारण्यात आले आहे. आता या बंगल्याचे मूल्य १४६.७ कोटी इतके आहे.

‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…