बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वात आपल्या अभिनयाची छाप उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री शम्मी यांचं दीर्घ आजाराने निधन झाले. 'शम्मी आंटी' या नावानं अनेकजण त्यांना ओळखत होते. 'शिरिन फरहाद की तो निकल पडी' या चित्रपटात त्या शेवटच्या दिसल्या होत्या. (छाया सौजन्य : Express Archives) -
'शम्मी आंटी' या ८९ वर्षांच्या होत्या. त्यांनी बॉलिवूडमधल्या २०० हून अधिक चित्रपटात काम केलं. सुरुवातीच्या काळात त्यांनी विनोदी व्यक्तीरेखा साकारल्या होत्या.
शम्मी यांचा जन्म पारसी कुटुंबात झाला. त्यांचं खरं नाव होत नरगिस रबाडी. अभिनयाच्या क्षेत्रात त्या अनावधानानेच आल्या. 'मल्हार' चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यात त्या मुख्य भूमिकेत होत्या. याकाळात त्यांची ओळख नरगिस दत्त यांच्याशी झाली. 'मल्हार' चित्रपटात त्यांनी साकारलेल्या भूमिकेचं खूपच कौतुक झालं. छोट्या पडद्यावरील ‘देख भाई देख’, ‘जबान संभाल के’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘कभी ये कभी वो’ आणि ‘फिल्मी चक्कर’ यांसारख्या मालिकांमधील भूमिकांमुळे त्या आजही प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात आहेत. ‘कुली नं १’, ‘हम’, ‘गोपी किशन’, ‘हम साथ साथ है’ या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारली होती. -
खलनायिकेपासून ते विनोदी अशा अनेक भूमिका त्यांनी साकारल्या. बोमन इराणी सोबत त्यांनी शेवटचं काम केलं त्यानंतर मात्र आजारपणामुळे त्यांची प्रकृती खालावली.
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच