नाना पाटेकर – ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर अभिनेत्री तनुश्री दत्ताने गैरवर्तणुकीचा आरोप केला आहे. 'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटातील एका गाण्याच्या चित्रीकरणावेळी नानांनी गैरवर्तन केल्याचं तनुश्रीने म्हटलं. तनुश्रीच्या या आरोपानंतर चित्रपटसृष्टीमध्ये याविषयी चर्चा रंगल्याचं दिसून येत आहे. -
आलोक नाथ
चेतन भगत – प्रसिद्ध लेखक चेतन भगत याच्यावर देखील एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. आरोप करणाऱ्या महिलेने चेतन भगत यांच्यावर त्रास दिल्याचा आरोप करत दोघांमध्ये झालेल्या व्हॉट्सअॅपवरील चर्चेचे स्क्रिनशॉट्स सोशल मीडियावर पोस्ट केले. महिलेच्या या पोस्टनंतर चेतन भगतने सोशल मीडियावर महिलेची जाहीर माफी मागितली. -
विकास बहल
विवेक अग्निहोत्री- तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर आरोप केल्यानंतर तिने चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीवर देखील आरोप केले आहे. 'चॉकलेट' चित्रपटाच्या सेटवर विवेक अग्निहोत्री यांनी मला कपडे काढायला सांगितले होते, असा आरोप तनुश्रीने केला. रजत कपूर – चित्रपट निर्माता, अभिनेता रजत कपूर यांच्यावर दोन महिलांनी लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप केला आहे. त्यानंतर अल्पावधीत रजत कपूर यांनी माफी मागत हे प्रकरण पूर्णपणे शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. कैलाश खेर – प्रसिद्ध गायक कैलाश खेरवर एका महिला पत्रकाराने लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले होते. त्यानंतर पार्श्वगायिका सोना मोहापात्रानेही कैलास खेरवर आरोप केले आहेत. परंतु कैलाश यांनी हे सारे आरोप फेटाळून लावले आहेत.

‘एमपीएससी’ची राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलली जाणार ? आयोग घेणार ‘हा’ निर्णय