मराठी सिनेरसिकांच्या गळ्यातील ताईत लक्ष्या म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. या लाडक्या अभिनेत्याचा आज स्मृतिदिन. ३ नोव्हेंबर १९५४ साली जन्म झालेल्या लक्ष्मीकांत यांनी १६ डिसेंबर २००४ ला जगाचा निरोप घेतला. मात्र त्यांच्या अभिनयामुळे ते आजही चाहत्यांच्या स्मरणात आहेत. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मराठी चित्रपटातच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवला. रंगभूमीवरील ‘टूरटूर ’ या नाटकातून लक्ष्मीकांत बेर्डे नावाचा नवा तारा उदयास आला. त्यांचे पहिलं नाटक रसिकांनी डोक्यावर घेतले. सगळे सारखेच या चित्रपटातील एक दृश्यात अश्विनी भावे आणि लक्ष्मीकांतजी. ‘शांतता कोर्ट चालू आहे’, ‘बिघडले स्वर्गाचे दार’ अशा नाटकातून लक्ष्मीकांत यांच्यातल्या कसलेल्या अभिनेत्याची ओळख आणखी गडद झाली. दिग्गज बॉलीवूड अभिनेता दिलीप कुमार यांच्यासह लक्ष्मीकांत आणि अशोक सराफ. अचूक टायमिंगमुळे कॉमेडी भूमिकांवर लक्ष्मीकांत यांची विशेष पकड होती. लक्ष्मीकांत यांनी मराठीसोबतचे बॉलीवूडमध्येही आपली जादू दाखविली. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक बड्या कलाकारांसोबत काम केले. 'संग्राम' या चित्रपटात त्यांनी अमरिश पुरी यांच्यासोबत काम केले होते. 'हम आपके है कौन' चित्रपटातील एक दृश्य. मराठीत ‘एक होता विदूषक’ गंभीर नाटकातील भूमिकेने लक्ष्मीकांत यांच्या अभिनयक्षमतेवर शिक्कामोर्तब झाले. लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ यांच्यातील मैत्री अतूट होती. त्यांच्या मैत्रीचे गोडवे आजही चित्रपटसृष्टीत गायले जातात.

Vaibhav Suryavanshi: १४ वर्षीय वैभवने रचला इतिहास! ३५ चेंडूत झळकावलं वादळी शतक