ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचं वयाच्या ८१ व्या वर्षी दीर्घ आजारानं निधन झालं आहे. कादर खान यांना श्वास घेताना त्रास होत असल्याने कॅनडातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कॅनडामध्येच कादर खान यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कादर खान यांनी 1973 मध्ये ‘दाग’ चित्रपटातून अभिनयात पदार्पण केलं. 300 हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. नाटकापासून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या कादर खान यांनी अनेक चित्रपटांसाठी संवादलेखनदेखील केलं. 250 पेक्षा जास्त चित्रपटांचं संवाद लेखन त्यांनी केलं -
करिअरच्या सुरुवातीला व्हिलनचं पात्र साकारण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या कादर खान यांनी हिंमतवाला चित्रपटापासून कॉमेडी भूमिकांकडे आपलं लक्ष्य केंद्रीत केलं होतं.
-
मुलासाठी ते खलनायकाच्या भूमिकेकडून विनोदवीराच्या भूमिकेकडे वळले.
-
कादर खान यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं. गोविंदासोबत त्यांची जोडी प्रेक्षकांना जास्त भावली. आँखे, मै खिलाडी तू अनाडी, जुदाई, खून भरी मांग, बिवी हो तो ऐसी, बोल राधा बोल, जुडवा अशा अनेक हिट चित्रपटांमध्ये त्यांचा अभिनय पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली.
-
आपल्या 45 वर्षांच्या करिअरमध्ये कादर खान यांनी दिग्दर्शक डेव्हिड धवन आणि गोविंदासोबत सर्वात जास्त काम केलं 1990 चा काळ या तिघांनी अक्षरक्ष: गाजवला होता.
-
साजन चले ससुराल, हिरो नंबर 1, कुली नंबर 1, दुल्हे राजा, हसीना मान जायेगी असे अनेक सुपरहिट चित्रपट तिघांनी केले.
-
कादर खान यांनी अमिताभ बच्चन यांच्या ‘सत्ते पे सत्ता’, ‘नसीब’, ‘मुक्कदर का सिंकदर’ अशा गाजलेल्या चित्रपटासाठी संवादलेखन केलं. या दोघांमध्ये घट्ट मैत्रीही होती मात्र एका प्रसंगानंतर या दोघांच्या मैत्रीत दुरावा आला.
-

Zapuk Zupuk: रविवारी ‘झापुक झुपूक’ची कमाई घसरली, ३ दिवसांचे कलेक्शन फक्त ‘इतके’ लाख