लोकप्रिय मराठी अभिनेते अशोक सराफ यांचा आज वाढदिवस. (छाया सौजन्यः एक्स्प्रेस आर्काइव्ह) मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी चित्रपटांचा काळ गाजवणारे अशोक सराफ हे मराठीतले सुपरस्टार आहेत. विनोदी भूमिका सादर करतांनाचे त्याचे टायमिंग लाजवाब असे आहे. सुरुवातीपासूनच नाटकांची अतिशय आवड असलेल्या अशोक सराफ यांनी वयाच्या १८ व्या वर्षी शिरवाडकरांच्या ‘ ययाती आणि देवयानी' या नाटकातील विदूषकाच्या भूमिकेद्वारे व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला. अशोक सराफ यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपट, नाटक तसेच टिव्ही मालिकांमधून विविध प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. 'पांडू हवालदार' , 'कळत नकळत', 'भस्म', 'वजीर', 'चौकट राजा','बनवाबनवी' या चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या आहेत. लक्ष्मीकांत बेर्डेबरोबरची त्यांची जोडी प्रचंड गाजली आणि या जोडगोळीने अशी ही 'बनवाबनवी', 'धूमधडाका' यासारख्या चित्रपटांमार्फत धमाल उडवून दिली. अशोक सराफ यांनी केवळ विनोदी धाटणीच्या भूमिका न करता गंभीर आणि खलनायकी स्वरूपाच्या भूमिका देखील केल्या आहेत. मुंबईत जन्मलेले अशोक सराफ मुळचे बेळगावचे असून दक्षिण मुंबईच्या चिखलवाडी भागात त्यांचे बालपण गेले. बाळासाहेब ठाकरे यांच्यासह गप्पा मारताना अशोक सराफ आणि निवेदिता सराफ
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”