‘हमराज’, ‘गुप्त’, ‘सोल्जर’ यांसारख्या चित्रपटांमधून आपली छाप सोडणारा अभिनेता बॉबी देओलचा मुलगा आर्यमान सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. आर्यमान त्याच्या फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असून नेटकरी त्याच्यावर फिदा आहेत. आर्यमान नेटकऱ्यांना इतका आवडला आहे की अनेकांनी त्याला बॉलिवूड पदार्पणाचा सल्ला दिला आहे. काहींनी तर बॉबी देओलला मुलासोबत ‘सोल्जर २’ चित्रपट बनव असाही सल्ला दिला आहे. बॉबी देओलने त्याच्या ५०व्या वाढदिवशी आर्यमानसोबतचा फोटो शेअर केला होता. तेव्हापासून आर्यमान नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. आर्यमानला लाइमलाइटमध्ये राहायला फारसं आवडत नाही. -
गतवर्षी पार पडलेल्या 'आयफा' पुरस्कार सोहळ्यात त्याला वडिलांसोबत पाहिलं गेलं. त्या कार्यक्रमातील फोटोसुद्धा सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.
-
येत्या काळात आर्यमानने जर बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं तर इतर स्टारकिड्सना तो चांगलंच आव्हान देईल असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
IND vs ENG : रोहित शर्मा मालिका विजयानंतर विसरला ट्रॉफी? विराट-राहुल हसतानाचा मजेशीर VIDEO व्हायरल