-
'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील 'शेवंता'च्या भूमिकेमुळे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर घराघरांत लोकप्रिय झाली. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/अपूर्वा नेमळेकर)
-
‘झी मराठी’च्या ‘आभास हा’ या मालिकेतून पदार्पण केलेल्या अपूर्वाने ‘भाखरवाडी ७ किमी’, ‘इश्कवाला लव्ह’सारख्या चित्रपटांमधून काम केले आहे. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/अपूर्वा नेमळेकर)
अपूर्वाचं नॅशनल कॉलेज वांद्रे आणि त्यानंतर रुपारेल कॉलेज अशा दोन ठिकाणी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झालं. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/अपूर्वा नेमळेकर) -
कॉलेजमध्ये असतानाच तिला मालिकेसाठी विचारणा झाली होती. पण तिने ती नाकारली. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/अपूर्वा नेमळेकर)
-
अभिनय क्षेत्रात येणे हीच नियती होती, असे मानणाऱ्या अपूर्वाने या क्षेत्रात येण्याबद्दल कधीच विचार केला नव्हता. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/अपूर्वा नेमळेकर)
-
पदवीचं शिक्षण पूर्ण होत असतानाच अपूर्वाला ‘आभास हा’ मालिकेतील आर्या नावाच्या मुख्य नायिकेच्या व्यक्तिरेखेसाठी आयरिश निर्मिती संस्थेकडून विचारणा झाली. ती व्यक्तिरेखा तिच्यात वयोगटातल्या मुलीची असल्यामुळे तिने होकार दिला. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/अपूर्वा नेमळेकर)
-
व्यवस्थापनशास्त्रातील पदवी घेतल्यानंतर एमबीए करण्याचा मानस असलेल्या अपूर्वाने इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीपासून सुरुवात केली होती, मात्र आता अभिनयाच्या क्षेत्रात स्थिरस्थावर झाल्यावरही इमिटेशन ज्वेलरी डिझाइनिंगचा स्वत:चा ब्रॅण्ड तिने विकसित केला. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/अपूर्वा नेमळेकर)
-
व्यवसाय आणि अभिनय या दोन्हीची सांगड घालण्यात ती यशस्वी ठरली आहे. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/अपूर्वा नेमळेकर)
-
अपूर्वा ही दिग्दर्शक प्रतिमा कुलकर्णी यांना तिचे गुरू मानते. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/अपूर्वा नेमळेकर)
-
अभिनयाव्यतिरिक्त तिला पेंटिंग आणि स्केचेस करायलाही आवडतं. (छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/अपूर्वा नेमळेकर)

महिलांनो आता मेथीची भाजी निवडायचं टेन्शन कायमचं गेलं; या भन्नाट ट्रीकनं ५ मिनिटांत मेथी साफ, VIDEO पाहून अवाक् व्हाल