-
झी मराठीच्या मालिका प्रेक्षकांमध्ये कमालीच्या लोकप्रिय आहेत.
-
झी मराठीवरील याच मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे झी मराठी अवॉर्ड्स.
-
दरवर्षी अतिशय देखण्या आणि दिमाखदार पद्धतीने हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडतो.
-
कलाकारांचे दिलखेचक परफॉरमन्स, विनोदी स्किटस् आणि सोबतीला कोणता कलाकार, कोणती जोडी, कोणती मालिका, कोणतं कुटुंब सर्वोत्कृष्ट ठरेल याची लागलेली उत्सुकता अशा वातावरणात हा कार्यक्रम रंगतो.
-
यंदा झी मराठी वाहिनीने २० वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला त्यामुळे हा सोहळ्याची रंगत अजूनच वाढली आहे.
-
हा दैदिप्यमान सोहळा प्रेक्षकांना रविवार २० ऑक्टोबर संध्याकाळी ७ वाजता पाहायला मिळणार आहे.
-
त्याचसोबत प्रेक्षकांनी त्यांच्या आवडत्या कलाकारांना भरभरून मतं दिल्यामुळे कुठले कलाकार विजयी ठरणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे.

‘या’ तीन राशींना शनी-शुक्र देणार नुसता पैसा; ३० वर्षानंतर मीन राशीतील ग्रहांची युती भाग्य चमकवणार