'आशिकी' या चित्रपटामुळे लोकप्रिय झालेल्या अनु अग्रवाल हिने इंडो-जर्मन चित्रपट 'द क्लाउड डोर' यात टॉपलेस सीन दिला होता. ७० च्या दशकामध्ये आपल्या अभिनयाने साऱ्यांना भूरळ घालणाऱ्या अभिनेत्रीने रेखा यांनी सुरुवातीच्या काळामध्ये बी-ग्रेट चित्रपटांमध्ये काम केलं होतं. 'प्राण जाए पण वचन न जाये' या चित्रपटामध्ये त्यांनी बोल्ड सीन दिला होता. राज कपूर दिग्दर्शित ‘राम तेरी गंगा मैली’ हा चित्रपट २५ जुलै १९८५ साली प्रदर्शित झाला.या चित्रपटातील ‘तुझे बुलाएँ ये मेरी’ हे गाणं त्याकाळी प्रचंड गाजलं होतं. या गाण्यामध्ये मंदाकिनीने अनेक बोल्ड सीन दिले असून धबधब्याखाली अंघोळ करतानाचा तिचा व्हिडीओ विशेष गाजला होता. 'मेरा नाम जोकर' या चित्रपटामध्ये अभिनेत्री सिमी ग्रेवाल हिने न्यूड सीन दिला होता. तर सिद्धार्थ या चित्रपटामध्ये टॉपलेस सीन दिला होता. पूर्वीच्या काळी बॉलिवूडमधील सर्वात बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री झीनत अमान यांनी 'सत्यम शिवम सुंदरम' या चित्रपटामध्ये बोल्ड सीन दिले होते.

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…