-
नेहा पेंडसे – नेहा पेंडसेचा मराठीत मोठा चाहतावर्ग आहे. ‘मे आय कम इन मॅडम’ या विनोदी मालिकेतून तिनं हिंदी प्रेक्षकांमध्येही स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. (फोटो सौजन्य : नेहा पेंडसे / इंस्टाग्राम)
-
श्रुती मराठे – ‘मराठी मनोरंजन विश्वात काम करण्याबरोबच श्रुतीनं दाक्षिणात्य चित्रपटातही काम केलं आहे. (फोटो सौजन्य : श्रुती मराठे / इंस्टाग्राम)
-
रसिका सुनील – माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून घराघरामध्ये पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रसिका सुनिल. रसिका फिटनेसची काळजी घेत असल्याचे या फोटोवरुन दिसत आहे. (फोटो सौजन्य : / इंस्टाग्राम)
-
वैदेही परशुरामी – मराठी चित्रपटासोबत बॉलीवूडमधील 'सिम्बा' या चित्रपटातही वैदेही परशुरामीने ठसा उमटवला आहे. (फोटो सौजन्य : रसिका सुनील / इंस्टाग्राम)
-
स्मिता गोंदकर – बिग बॉस मराठी पर्व पहिलेमधील सर्वात जास्त चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे स्मिता गोंदकर. स्मिता ‘पप्पी दे पारूला’ या गाण्यामुळे घराघरात पोहोचली होती. परंतु बिग बॉस मराठीमुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आली. बोल्ड लूक, दिलखेचक अदा, ग्लॅमरस अंदाज यासाठी स्मिता विशेष ओळखली जाते. स्मिताचा चाहता वर्गदेखील मोठा आहे. (फोटो सौजन्य : स्मिता गोंदकर / इंस्टाग्राम)
-
मिताली मयेकर – बेधडक आणि बिंधास ‘फ्रेशर्स’ फेम मिताली मयेकर हिने कमी वेळातच तिच्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. (फोटो सौजन्य : मिताली मयेकर / इंस्टाग्राम)
-
मिथिला पालकर – वेब सीरिज, छोटे व्हिडीओज, कप साँग यानिमित्ताने मिथिला लोकप्रिय झाली. तिच्या या लोकप्रियतेमागचं कारण म्हणजे तिचा हटके अंदाज हेच आहे. (फोटो सौजन्य : मिथिला पालकर / इंस्टाग्राम)
-
राधिका आपटे – अभिनेत्री राधिका आपटे तिच्या दमदार अभिनय कौशल्यासाठी ओळखली जाते. चौकटीबाहेरच्या भूमिका साकारत राधिकाने बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. राधिकाने नेटफ्लिक्सच्या ‘सेक्रेड गेम्स’, ‘लस्ट स्टोरीज’ आणि ‘घोल’मध्ये काम करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. (फोटो सौजन्य : राधिका आपटे / इंस्टाग्राम)
-
प्रिया बापट – प्रिया बापट ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.प्रियाने आतापर्यंत साकारलेल्या प्रत्येक भूमिकेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. (फोटो सौजन्य : प्रिया बापट / इंस्टाग्राम)
-
अमृता खानविलकर – अमृता खानविलकर अगदी तशीच एनर्जेटिक आहे. तिच्या करिअरला किती वर्षे झाली, त्यात तिने किती मराठी व हिंदी चित्रपटात भूमिका साकारल्या, त्यातले किती हिट झाले, कोणते पडद्यावर आल्या आल्या गेले, छोट्या पडद्यावरची तिची वाटचाल, म्हटलं तर बोल्ड बट ब्युटीफूल दृश्यांनी लक्षवेधक ठरली. (फोटो सौजन्य : अमृता खानविलकर / इंस्टाग्राम)
-
सोनाली कुलकर्णी – उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्यांमुळे सोनालीने प्रत्येक प्रेक्षकाच्या मनावर राज्य केलं.'नटरंग' चित्रपटातील 'अप्सरा आली' या गाण्यामुळे ती खऱ्या अर्थाने नावारुपाला आली. (फोटो सौजन्य : सोनाली कुलकर्णी / इंस्टाग्राम)
-
सई ताम्हणकर – मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री सई ताम्हणकर. 'दुनियादारी', 'सौ. शशी देवधर', 'बालक पालक', 'टाइम प्लीज', 'तू ही रे', 'वजनदार', 'वायझेड', 'क्लासमेट्स' यांसारख्या अनेक चित्रपटांतून सईने तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला. (फोटो सौजन्य : सई ताम्हणकर / इंस्टाग्राम)

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यातील ४ संशयित दहशदवाद्यांना पाहिल्याचा महिलेचा दावा; जम्मू-काश्मीरच्या कठुआ येथे शोध मोहिम सुरू