अभिनेत्री प्रियांका चोप्रा हे नाव आता जगभरात ओळखीचं झालं आहे. बॉलिवूडपासून सुरु केलेला तिचा प्रवास हॉलिवूडपर्यंत येऊन पोहोचला आहे. २००२ साली करिअरची सुरुवात करणाऱ्या प्रियांकाने जीवनसाथी म्हणून देखील हॉलिवूड गायकाचीच निवड केली. प्रियांकाने लोकप्रिय गायक निक जोनासशी २०१८ मध्ये लग्न केलं. सुरुवातीपासूनच लोकप्रिय असलेली प्रियांका निक जोनासमुळे चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरली. पूर्वी बॉलिवूड चित्रपटांमुळे चर्चेत राहणारी प्रियांका आता हॉलिवूडमधील तिच्या किस्स्यांमुळे चर्चेत येत आहे. हॉलिवूडमधील एखादा चित्रपट असो किंवा तेथील पुरस्कार सोहळा, पार्टी या साऱ्यामुळे ती चर्चेत असते. प्रियांकाने नुकतील निकसोबत गॅमी पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी तिच्या उपस्थितीपेक्षा तिने परिधान केलेल्या ड्रेसचीच सर्वाधिक चर्चा सुरु झाली. तिचा ड्रेस काही चाहत्यांना फारसा रुचला नसून अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे. प्रियांकाने डिझायनर राल्फ रुसो यांनी डिझाइन केलेला गाऊन परिधान केला होता. या ड्रेसचा पुढचा गळा प्रचंड डीप असल्यामुळे तिला ट्रोल करण्यात आलं आहे. -
विशेष म्हणजे यापूर्वीदेखील प्रियांका तिच्या ड्रेसिंग सेन्ससमुळे ट्रोल झाली होती.
गॅमी पुरस्कार सोहळ्यामध्ये प्रियांका निकसोबत त्यांचे कुटुंबीयदेखील होते. -
संगीत क्षेत्रातील दमदार कामगिरीसाठी गॅमी पुरस्कार दिला जातो. यंदाच्या या सोहळ्यामध्ये संगीत क्षेत्राशी जोडलेल्या सर्व गायक, संगीतकारांनी हजेरी लावली होती.

DC vs MI: रोहित शर्माचा एक निर्णय अन् नवा चेंडू ठरला सामन्याचा टर्निंग पॉईंट, डगआऊटमधून हिटमॅन कसा ठरला गेमचेंजर?