बॉलिवूडचे शेहनाशह अमिताभ बच्चन यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. पण त्यांच्या एका चित्रपटाची चर्चा आजची पिढीदेखील करताना दिसते. तो चित्रपट म्हणजे सुर्यवंशम. २१ मे १९९९ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपटाला २२ वर्ष झाली असली तरी आजही या चित्रपटाची चर्चा असते. अमिताभ बच्चन यांचा चित्रपटात डबल रोल होता. सूर्यवंशम हा सिनेमा १९९७ मध्ये आलेल्या तामिळ सिनेमा ‘सूर्यवमसम’चा रिमेक होता. 'सेट मॅक्स' या वाहिनीने हा चित्रपट अजरामर केला आहे. यामुळेच सोशल मीडियावर हा चित्रपट नेहमी चर्चेत असतो. -
हा सिनेमा जवळपास दररोज ‘सोनी मॅक्स’ या चॅनलवर दाखवला जातो. सात कोटींमध्ये तयार झालेल्या या सिनेमाने त्यावेळी १२ कोटी ६५ हजारांचा गल्ला जमवला होता. ‘सोनी मॅक्स’वर हा चित्रपट सारखा का दाखवला जातो असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. याच प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देणार आहोत. -
सिनेमा रिलीज झाला त्याच वर्षी ‘सेट मॅक्स’ हे चॅनल लॉन्च झालं होतं. आता ‘सेट मॅक्स’ हे ‘सोनी मॅक्स’ नावाने ओळखलं जातं. ‘सूर्यवंशम’ हा सिनेमा आणि सेट मॅक्स चॅनल हे दोन्ही एकाच वर्षी आले.
चॅनलने ‘सूर्यवंशम’ या सिनेमाचे १०० वर्षांचे राईट्स विकत घेतले आहेत. त्यामुळे हा सिनेमा वारंवार दाखवला जातो अशी माहिती सोनी मॅक्सच्या मार्केटिंग हेड वैशाली शर्मा यांनी एका मुलाखतीत दिली होती. यामधील २१ वर्ष पूर्ण झाली आहेत. याचाच अर्थ पुढील ७९ वर्ष हा चित्रपट सेट मॅक्सवर दाखवला जाणार आहे. १९९७ ते २००० पर्यंत ‘सूर्यवंशम’ च्या कथेवर चार सिनेमे तयार झाले आहेत. पहिला सिनेमा १९९७ मध्ये तामिळमध्ये सरथ कुमार आणि देवयानी यांच्या प्रमुख भूमिकेत तयार झाला. त्यानंतर १९९८ मध्ये तेलुगुमध्ये दग्गुबाती वेंकटेश आणि मीना दुरईराज यांच्या प्रमुख भूमिकेत दुसरा सिनेमा बनला. तिसरा सिनेमा १९९९ मध्ये अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला ‘सूर्यवंशम’ नावाने प्रदर्शित झाला. तर चौथा सिनेमा २००० मध्ये कन्नड भाषेत बनवण्यात आला. यामध्ये विष्णुवर्धन आणि ईशा कोप्पिकर प्रमुख भूमिकेत होते. या सिनेमाचं शूटिंग गुजरात, हैद्राबाद आणि पोलोन्नारुवा, कॅन्डी श्रीलंकामध्ये झाली होती. बंगालमध्ये हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरली होता. कोलकाताच्या मेट्रो सिनेमामध्ये या सिनेमाने १०० दिवस पूर्ण केले होते. -
या सिनेमाची प्रमुख अभिनेत्री सौंदर्या रघु आता यांचा हा पहिला आणि शेवटचा हिंदी सिनेमा ठरला. १७ एप्रिल २००४ रोजी बंगळुरुजवळ एका विमान दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला.
“माकडतोंड्या, बोबडा बोलतो…सूरजचा सिनेमा फ्लॉप करायचा ठरवलं होतं”, केदार शिंदेंचा ट्रोलर्सबाबत मोठा दावा, म्हणाले…