झी युवा वाहिनीवरील युवा डान्सिंग क्वीन हा कार्यक्रम सध्या भरपूर गाजतोय. अनेक मराठी सेलिब्रिटी डान्सर असलेला हा कार्यक्रम सध्या त्यातील नृत्याविष्कारांमुळे प्रेक्षकांना आवडायला लागला आहे. फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना त्यामुळे प्रेम रस घेऊन सगळे स्पर्धक त्यांचे निरनिराळे परफॉर्मन्स सादर करत आहेत. शिकारी आणि झी ५ वरील काळे धंदे या चित्रपटांमुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री नेहा खानचा कार्यक्रमात हॉट अंदाज पाहायला मिळाला. 'चांद मातला, जीव गुंतला' या गाण्यावर तिने नृत्य सादर केले. या गाण्याची कोरिओग्राफ़ी ओंकार शिंदे याने एवढी उत्तम केलेली की युवा डान्सिंग क्वीनचे दोन्ही परीक्षक मयूर वैद्य आणि सोनाली कुलकर्णी हरवून गेले. दोघांनाही नेहाचे हावभाव आणि डान्स खूपच आवडला. तिने या आधी असा परफॉर्मन्स का नाही केला असाही प्रश्न त्यांनी तिला विचारला. नेहा खानने महेश मांजरेकर यांच्या 'शिकारी' चित्रपटातून पदार्पण केलं. या चित्रपटातील बोल्ड दृश्यांमुळे ती चर्चेत आली होती. -
माझी आई मराठी असल्याने मला मराठी इंडस्ट्री खूप जवळची वाटते, असं ती म्हणते.
फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम/ नेहा खान फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम/ नेहा खान फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम/ नेहा खान

स्वारगेट एस टी स्थानकात शिवशाही बसमध्ये प्रवासी तरुणीवर बलात्कार