स्टार प्रवाह वाहिनीवरील 'रंग माझा वेगळा' या मालिकेने सर्वांचंच लक्ष वेधलं. रंगावरून, वर्णावरून मान अपमानाच्या अनेक गोष्टी आपण ऐकतो. हाच विषय घेऊन ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेत अभिनेत्री रेश्मा शिंदे मुख्य भूमिकेत आहे. या मालिकेतील दिपाच्या भूमिकेसाठी रेश्माला मेकअप करून सावळ्या रंगाची तरुणी म्हणून दाखवण्यात आलं आहे. खऱ्या आयुष्यात मात्र रेश्मा फार वेगळी दिसते. रेश्माने याआधी काही प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केलंय. 'नांदा सौख्य भरे' या मालिकेतून रेश्मा प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. कलर्स मराठी वाहिनीवरील 'चाहूल' या मालिकेतही तिने भूमिका साकारली होती. मराठीसोबतच रेश्माने हिंदीतही काम केलंय. रेश्मानं 'केसरी नंदन' या हिंदी मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. रेश्मा ख-या आयुष्यात मनमोकळ्या स्वभावाची आहे. -
रेश्माचा आवडता अभिनेता आणि आधीपासून क्रश असलेली व्यक्ती म्हणजे अक्षय कुमार.
'लालबागची राणी' या चित्रपटातून ती दिसली. खऱ्या आयुष्यातील दिपा सुंदर असून सोशल मीडियावर अनेक सुंदर फोटो पोस्ट करत असते. -
(छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/ रेश्मा शिंदे)
-
(छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/ रेश्मा शिंदे)
-
(छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/ रेश्मा शिंदे)
(छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/ रेश्मा शिंदे)

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही