-
मालिका-चित्रपट आणि रंगभूमी गाजवणारी अभिनेत्री म्हणजे गिरिजा ओक-गोडबोले. ( सर्व फोटो सौजन्य – गिरिजा ओक गोडबोल इन्स्टाग्राम)
-
सौंदर्याबरोबरच आपल्या अभिनयाच्या बळावर गिरिजा ओकने चित्रपट सृष्टीत स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे.
-
आमिर खान बरोबर 'तारे जमीन पर' आणि 'शोर इन द सिटी' या चित्रपटातून गिरिजाच्या हिंदी चित्रपटांमधील गाजलेल्या भूमिका आहेत.
-
गिरिजा वयाच्या १५ व्या वर्षापासून अभिनयाच्या क्षेत्रात असून तिला अभिनयाचा वारसा घरातूनच मिळाला आहे. गिरिजा प्रसिद्ध अभिनेते गिरीश ओक यांची कन्या आहे.
-
कांदिवलीतील ठाकूर कॉलेज ऑफ सायन्स आणि कॉमर्समधून गिरिजाने बायोटेक्नोलॉजीमध्ये पदवी मिळवली.
-
गिरिजा ओकचे लग्न झाले असून तिच्या मुलाचे नाव कबीर आहे. काही दिवसांपूर्वी तिने मुलासोबतचा फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.
-
गिरिजा प्रसिद्ध अभिनेते, संवाद लेखक आणि निर्माते श्रीरंग गोडबोल यांची सून आहे.
-
हिंदी-मराठी चित्रपट आणि मालिका, जाहिराती, नाटकांमध्ये भूमिका केल्यानंतर तिने प्रथमच मराठी लघुपटातही काम केले होते.
-
कमी वेळात खूप सांगण्याची आणि आशय प्रभावीपणे मांडण्याची ताकद लघुपटांमध्ये असते, त्यामुळे आपल्यालाही एखाद्या लघुपटात काम करण्याची संधी मिळावी असे कायम वाटत होते. ‘क्वॉर्टर’द्वारे ही इच्छा पूर्ण झाल्याची भावना गिरिजाने व्यक्त केली होती.
-
गुलमोहर, मानिनी हे चित्रपट लेडीज स्पेशल या हिंदी मालिकांमध्ये काम करत आहे.
Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल