'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे अभिजीत खांडकेकर. मालिकेमध्ये शनाया, राधिका आणि अलिकडेच आलेली मीरा या स्त्रियांचा घोळका त्याच्या बाजूला असला तरीदेखील त्याचं खरं प्रेम दुसऱ्याच एका मुलीवर असल्याचं पाहायला मिळतं. (सौजन्य: सर्व फोटो सुखदा खांडकेकर फेसबुक/इन्स्टाग्राम) गुरुनाथ सुभेदार अर्थात अभिजीत खांडकेकर यांचं खरं प्रेम अन्य कोणत्या स्त्रीवर नसून खुद्द त्याच्या पत्नीवरच आहे. अभिजीतच्या पत्नीचं नाव सुखदा खांडकेकर असं असून तीदेखील अभिजीतप्रमाणेच उत्तम अभिनेत्री आहे. अभिजीत आणि सुखदा यांचं लव्ह मॅरेज आहे. एका कॉमन फ्रेंडमुळे या दोघांची ओळख झाली आणि त्यानंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात अन् पुढे लग्नात झालं. उत्तम अभिनय आणि सौंदर्य यामुळे सुखदाचे अनेक चाहते आहेत. सुखदाने काही मालिका, नाटक आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सुखदाने 'देवदास', 'कनुप्रिया', 'डूबधान', 'धारा की कहानी' आणि 'उमराव' अशा हिंदी नाटकांमध्येही तिनं काम कंल आहे. तिचं 'तेरी भी चूप, मेरी भी चूप’ हे नाटक विशेष गाजलं. 'बाजीराव-मस्तानी' या चित्रपटातदेखील तिने छोटेखानी भूमिका साकारली आहे. अभिनेत्री असण्यासोबतच ती उत्तम नृत्यांगना आहे. तिने कथ्थक या नृत्यप्रकाराचं प्रशिक्षण घेतलं आहे. सुखदा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर अॅक्टीव्ह असते. सुखदाला फोटोशूट करण्याची प्रचंड हौस असून तिने यापैकी बरेचसे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. सिंगापूरमध्ये अभिजीतने काढलेला सुखदाचा फोटो सुखदाला बदलत्या काळानुसार फॅशन कॅरी करायला आवडतात. सुखदाने मानेवर खास टॅटू काढल्याचं दिसून येत आहे. सुखदाने खणाच्या कापडापासून तयार केलेला डिझाइन ड्रेस परिधान केला आहे सुखदाने साडीमधील बरेचसे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामुळे कदाचित तिला साडी विशेष आवडत असावी हे यावरुन दिसतंय. बोल्ड आणि बिनधास्त फोटोशूटमधील हा एक फोटो

शाळा बुडवून मुलगी बॉयफ्रेंडसोबत करत होती रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून सांगा काकांनी बरोबर केलं का?