-
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडिया आणि ग्लॅमरच्या दुनियेपासून दूर असते.
-
सारा सोशल मीडियावर फारशी अॅक्टिव्ह नसते. पण तिने पोस्ट केलेले फोटो आणि व्हिडीओ इंटरनेटवर चांगलाच धमाका करतात.
-
सारा तेंडुलकर हिने नुकतेच सोशल मीडियावर आपले काही फोटो पोस्ट केले आहेत. त्या ग्लॅमरस फोटोंची सर्वत्र चर्चा होत आहे.
-
साराने या फोटोंमध्ये काळ्या रंगाचे पाश्चात्य कपडे परिधान केले आहेत. न्यूयॉर्कच्या एका रम्य शहरी भागातील हे फोटो आहेत.
-
'सोशल डिस्टन्सिंग'मुळे मी माझ्याकडे असलेले माझे २०१९ चे फोटो पाहत आहे, असे तिने त्या फोटोंबाबत लिहिले आहे.
-
साराने मार्च महिन्याच्या सुरूवातीला तिचा एका मैत्रिणीसोबतचा फोटोही पोस्ट केला होता. इंग्लंडमधील एका रेस्टॉरंटमधील फोटो तिने शेअर केला होता.
-
सारा तेंडुलकर ही सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर यांची कन्या आहे. तिचा जन्म १९९७ मध्ये झाला.
-
साराने आपले शालेय शिक्षण धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून केले. सध्या सारा लंडनमध्ये आपले पुढील शिक्षण घेत आहे.
-
सचिनने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तेव्हा सारा तिची आई आणि भाऊ अर्जुन यांच्याबरोबर मैदानावर उपस्थित होती.
-
त्यानंतर सारा अधिक चर्चेचा विषय ठरली. गुगलच्या टॉप सर्च निकालांमध्येही काही काळ ती आघाडीवर होती.
-
साराने त्यानंतर लंडनमध्ये आपल्या शिक्षणाबाबतच्या फोटोंमुळे चर्चेचा विषय ठरली होती. तेव्हा सचिन आणि अंजली यांनी तिच्यासोबतचा फोटो शेअर केला होता.
-
काही काळ सारा चर्चा आणि ग्लॅमरस जगापासून दूर होती. पण मधल्या काळात युवा क्रिकेटपटू शुभमन गिल याच्या फोटोवर कमेंट केल्याने ती पुन्हा चर्चेत आली होती.
-
शुभमनच्या फोटोवरील कमेंटच्या प्रकारानंतर साराने काही काळ सोशल मीडियाकडे पाठ फिरवली होती.
-
सध्या मात्र लॉकडाउन काळ असल्याने सारा आपल्याकडे असलेल्या जुन्या आठवणींना उजाळा देत आहे.
-
सर्व फोटो – इन्स्टाग्राम / सारा तेंडुलकर
![US Illegal Immigrants deported](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Latest-Marathi-News-2025-02-06T085413.429.jpg?w=300&h=200&crop=1)
US Illegal Immigrants : ‘अमेरिकेत होते हे माहितीच नव्हतं’, ट्रम्प यांनी भारतात परत पाठवलेल्या गुजराती स्थलांतरितांच्या कुटुंबियांचा खुलासा