-
अॅमेझॉनवरील 'पाताल लोक' ही वेब सीरिज सध्या प्रंचड चर्चेत असून यामधील सर्वच कलाकारांचं कौतुक केलं जात आहे. या वेब सीरिजमधील अनेक अभिनेत्यांना तुम्ही पहिल्यांदाच पाहिलं असेल. पण यामधील अनेक अभिनेते हे स्थानिक चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेते-अभिनेत्री आहेत. त्यांचे रिअल लाईफ फोटो आपण यानिमित्ताने पाहूयात
-
नीरज काबी
-
नीरज एक उत्तम अभिनेते असून गेल्या काही काळापासून अत्यंत महत्त्वाच्या भूमिका निभावत आहेत. 'हिचकी', 'लाल कप्तान', 'तलवार' सारख्या चित्रपटांमध्ये त्यांना महत्त्वाच्या भूमिका मिळाल्या होत्या. पाताल लोकमध्ये नीरज पत्रकाराच्या भूमिकेत आहेत. (Photo Courtesy: Instagram)
-
अभिषेक बॅनर्जी
-
अभिषेक बॅनर्जी आपण सर्वांनी याआधी ड्रीमगर्ल, स्त्री आणि बाला चित्रपटात छोट्या भूमिकांमध्ये पाहिलं आहे. पण यावेळी अभिषेक निगेटिव्ह भूमिकेत दिसला. पाताल लोकमध्ये अभिषेक विशाल उर्फ हातोडा त्यागीच्या भूमिकेत आहे. अभिषेकने २०१४ मध्ये मॉडेल, आर्किटेक्ट आणि इंटिरिअर डिझायनर असणाऱ्या टिना नोरोन्हासोबत लग्न केलं आहे. (Photo Courtesy: Instagram)
-
गुल पनाग
-
अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी गुल पनाग खऱ्या आयुष्यात खूप बिनधास्त आणि साहसी आहे. वेब सीरिजमध्ये गुल पनाग खऱ्या आयुष्याच्या अगदी उलट भूमिका निभावत असून अत्यंत साधी दाखवली आहे. 'पाताल लोक'मध्ये गुल पनाग मुख्य भूमिकेत असून हाथीराम चौधरीच्या पत्नीच्या भुमिकेत दाखवली आहे. (Photo Courtesy: Instagram)
-
स्वस्तिका मुखर्जी
-
स्वस्तिका मुखर्जी प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री असून पाताल लोकमध्ये नीरज काबी यांच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. (Photo Courtesy: Instagram)
-
जयदीप अहलावत
-
'पाताल लोक'मधील मुख्य हाथीराम चौधरीची भूमिका जयदीप अहलावत याने निभावली आहे. या वेबसीरिजमुळे अखेर जयदीप अहलावतच्या संघर्षाला न्याय मिळाला असल्याचं बोललं जात आहे. (Photo Courtesy: Instagram)
-
जयदीपने गब्बर, कमांडो, राजी, गँग्स ऑफ वासेपूर सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. (Photo Courtesy: Instagram)
-
इश्वाक सिंग
-
डॅशिंग मॉडेल आणि अभिनेता असणाऱ्या इश्वाक सिंगने वेब सीरिजमध्ये एका तरुण पोलीस अधिकाऱ्याची भूमिका निभावली आहे. त्याच्या अभिनयाचं कौतुक करण्यात आलं आहे. रांजना चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. आर्किटेक्ट असणाऱ्या इश्वाकने फॅब इंटिरिअरसोबत काम केलं आहे. पण नंतर त्याने अभिनय करण्याचा निर्णय घेतला. (Photo Courtesy: Instagram)
-
निहारीका दत्त
-
निहारीका दत्त पाताल लोकमध्ये सारा मॅथ्यूज या पत्रकाराच्या भूमिकेत आहे. निहारीकाने नाटकांमध्ये काम केलं आहे. (Photo Courtesy: Instagram)
-
निहारीका दत्तचे वडीलदेखील अभिनेता असून मद्रास कॅफे, जॉली एलएलबी सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
-
अनिनदिता बोस
-
अनिनदिता बोस 'पाताल लोक'मध्ये चंदाच्या भूमिकेत आहेत. अनिनदिता बंगाली अभिनेत्री आहे. अनिनदिताने बंगाली अभिनेता सौरव दाससोबत लग्न केलं असून ती इन्स्टाग्रामवर एक प्रसिद्ध डुडल आर्टिस्ट आहे. (Photo Courtesy: Instagram)
-
जगजित साधू
-
जगजित साधू वेब सीरिजमध्ये तोप सिंगच्या भूमिकेत आहे. तोप सिंग आरोपीच्या भूमिकेत आहे. जगजित साधू एक प्रसिद्द पंजाबी अभिनेता आहे. थिएटरमध्ये त्याने डिग्री मिळवलेली आहे. (Photo Courtesy: Instagram)

विराट-अनुष्का देश सोडून लंडनला शिफ्ट झाले कारण…; माधुरी दीक्षितचे पती डॉ. नेनेंनी केला खुलासा; म्हणाले, “त्यांची मुलं…”