-
अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी मुंबईतील राहत्या घरात आत्महत्या केल्याच्या धक्कादायक बातमीनंतर आता दहा दिवसांनी पुन्हा आणखीन एक अशीच बातमी समोर आली आहे. लोकप्रिय टिकटॉक स्टार सिया कक्कड हीने आत्महत्या केली आहे. (सर्व फोटो: ट्विटवरुन)
-
सिया ही अवघ्या १६ वर्षांची होती.
-
रात्री सियाशी बोलणं झालं तेव्हा ती आनंद वाटत होती असं मॅनेजर अर्जुनने सांगितलं आहे.
-
सियाने आत्महत्या का केली यासंदर्भातील कोणताही माहिती अद्याप समोर आलेली नाही.
-
सियाच्या आत्महत्येचे वृत्त सर्वात आधी विरल भयानी या इन्स्टाग्रामवरील अकाउंटवरुन देण्यात आली आहे. हे इन्स्टाग्राम अकाउंट मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तींच्या बातम्या देण्यासाठी ओळखले जाते.
-
सियाच्या आत्महत्येची बातमी समोर येण्याच्या २० तास आधीच तिने इन्स्टाग्रामवर डान्स करतानाचा एक व्हिडिओ स्टोरी म्हणून अपलोड केला होता.
-
सियाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या शेवटच्या स्टोरीमध्ये ती एका पंजाबी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
-
सियाने आत्महत्या का केली यासंदर्भातील तपास पोलिसांनी सुरु केला आहे.
-
सियाचा मॅनेजर अर्जुन सरीनने दिलेल्या माहितीनुसार त्याने बुधवारी रात्री सियाबरोबर एका गाण्यासंदर्भात चर्चा केली होती.
-
आज सकाळी सियाच्या आत्महत्येची बातमी ऐकून मॅनेजरलाही धक्का बसला आहे. सियाने आथ्महत्या का केली हे आपल्यालाही अद्याप कळत नसल्याची पहिली प्रतिक्रिया अर्जुनने दिली आहे.
-
इन्स्टाग्रामवर सियाचे ९१ हजारहून अधिक फॉलोअर्स होते.
-
टीकटॉकवर सियाच्या अधिकृत अकाउंटला ११ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
-
सियाच्या आत्महत्येची बातमी समोर आल्यानंतर नेटकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. अनेकांनी ट्विटवरुन यासंदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
-
सियाचे अनेक चाहते खास करुन टीकटॉकर्स हे सोशल मिडियावर तिचे फोटो पोस्ट करुन तिला श्रद्धांजली अर्पण करत आहे.
-
अनेकांनी आधी सुशांत सिंह आणि आता सिया असं म्हणत हे वर्षच वाईट असल्याचे सांगत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.
-
सियाच्या आत्महत्येचे नक्की कारण आहे याचा पोलीस शोध घेत आहेत. सियाच्या आत्महत्येमागे परीक्षांच्या निकालाचा काही संबंध आहे का यासंदर्भातही सोशल मिडियावर चर्चा सुरु आहेत.

Pahalgam Terror Attack : गोळीबार सुरू होताच झाडावर चढून केलं संपूर्ण हल्ल्याचं रेकॉर्डिंग; स्थानिक व्हिडीओग्राफर बनला NIAचा प्रमुख साक्षीदार