-
सैराट या मराठी चित्रपटापासून आकाश ठोसर हे नाव आता महाराष्ट्रातील घराघरात परिचयाचं झालं आहे.
-
एखाद्या अभिनेत्याचा चित्रपट हिट झाला की त्याच्याबद्दल अनेक प्रकारचे गॉसिप रंगू लागतं. त्याच्याबद्दलच्या बातम्या लोक चवीचवीने वाचतात.
-
आकाशसारखा तरुण आणि हँडसम अभिनेता असेल, तर तरुणींना त्या अभिनेत्या संदर्भातील बातम्यांमध्ये अधिक रस असतो.
-
पण परशा-आर्ची जोडीतील परशा हा सध्या एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आहे.
-
आकाशने एका मुलीसोबतचा आपला फोटो पोस्ट केल्याने अनेक तरुणींच्या काळजाचा ठोकाच चुकला. पण ती मुलगी कोण आहे हे कळल्यावर मात्र त्याच्या तमाम चाहत्यावर्गाला हायसे वाटले.
-
काही दिवसांपूर्वी क्रिकेटपटू युजवेंद्र चहल याने रोहित शर्माचा महिला वेषातील एक फोटो पोस्ट केला होता. एका अॅप च्या साहाय्याने तो फोटो बनवला होता. (फोटो – युजवेंद्र चहल इस्टाग्राम)
-
तशाच प्रकारच्या अॅपच्या साहाय्याने आकाशने आपले चार वेगवेगळे महिला वेषातील फोटो बनवले आणि आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले.
-
आहे का कुणी अशी? असेल तर सांगा!! असं कॅप्शन देत आकाशने साऱ्या चाहत्यांना चॅलेंजदेखील दिले आहे.
-
गेले काही दिवस चेहरा बदलून स्त्रियांचे पुरूषी रूप किंवा पुरूषांचा महिला वेष कसा दिसेल याबद्दलच्या फोटोंचा ट्रेंड आला आहे. त्याचीच आकाशला भुरळ पडल्याचे दिसून आले.
-
सर्व फोटो – आकाश ठोसर इन्स्टाग्राम

VIDEO: “जेव्हा नवरीला मनासारखा नवरा भेटतो” लग्नात नवरीचा भन्नाट डान्स; नवरदेव लाजून लाल तर सासूबाईंची रिअॅक्शनही बघाच