-
अभिनेत्री दीप्ती केतकर हे नाव मराठी प्रेक्षकांना अजिबात नवीन नाहीय. मराठीमधील अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये दीप्तीने अभिनय केला आहे. (फोटो सौजन्य – दीप्ती केतकर इन्स्टाग्राम)
-
मुंबईत गोरेगावमध्ये लहानाची मोठी झालेल्या दीप्तीने नालंदा नृत्यकला महाविद्यालयातून कला शाखेमध्ये पदवी मिळवली.
-
दीप्तीला लहानपणापासूनच अभिनयाची प्रचंड आवड होती. शालेय जीवनापासूनच तिचा अभियनाशी संबंध आला.
-
मालिका, चित्रपटांमध्ये तिने आपले अभिनयाचे नाणे खणखणीत वाजवून दाखवले आहे. अभिनय, नृत्य आणि सौंदर्य याचा तिहेरी संगम म्हणजे दीप्ती केतकर
-
'अवघाची संसार' या मालिकेतून दीप्तीने छोटया पडद्यावर पदार्पण केले. पदार्पणाच्या मालिकेतच तिला मोठे यश मिळाले. या मालिकेत तिने शारदा राजे ही छोटी पण महत्त्वाची भूमिका साकारली होती. प्रसाद ओक या मालिकेत मुख्य भूमिकेत होता.
-
पण तिला खरी लोकप्रियता 'मला सासू हवी' मालिकेतील अभिलाषाच्या भूमिकेतून मिळाली.
-
'मला सासू हवी' मालिकेतील तिचे काही सीनही वाढवण्यात आले होते. प्रेक्षकांनी तिच्या व्यक्तीरेखेवर भरभरुन प्रेम केले. या मालिकेत तिची एक साईन लॅग्वेज होती.
-
चल गंमत करू, सनई चौघडे, भक्ती हीच खरी शक्ती या चित्रपटांमध्ये दीप्तीने काम केले आहे.
-
अवघाची संसार, मला सासू हवी, या मालिकांमधल्या तिच्या भूमिका गाजल्या. एका पेक्षा एक या डान्स शो मध्ये सहभाग घेतला होता.
-
दीप्तीने भरतनाटयममध्ये मास्टर्स केले आहे. त्यामुळेच तिने एका पेक्षा एक सीजन ७ डान्स शो ची ऑफर स्वीकारली.
-
दीप्तीचे लग्न झाले असून तिला एक मुलगी देखील आहे. मालिका, चित्रपटांमध्ये व्यस्त असतानाही ती आई, सून आणि पत्नी या जबाबदाऱ्याही यशस्वीपणे संभाळते.
-
एका पेक्षा एक सीजन ७ डान्स शो साठी दीप्तीने कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली, मुळा, बदाम, अक्रोड या सर्व गोष्टी एक ते दीड वर्ष बंद केल्या होत्या.
-
दीप्ती केतकरने 'कमला', 'हम तो तेरे आशिक है' या मालिकांमध्येही काम केले.
-
'भागो मोहन प्यारे' या मालिकेत मोहनच्या स्वप्नात 'मोहन च्या स्वप्नातल्या गोडबोले बाई' असे कॅप्शन दिप्तीने या फोटोला दिले आहे.
-
'हम तो तेरे आशिक है' या विनोदी मालिकेत दीप्तीने कावेरी वहिनींची भूमिका साकारली होती. या मालिकेत कावेरी हे पात्र कोल्हापूरचे दाखवण्यात आले. मूळची मुंबईची असूनही दीप्तीने हे पात्र फार सुंदररित्या साकारले. खास कोल्हापुरी शैलीमध्ये बोलण्यासाठी तिने विशेष मेहनत घेतली.

हनुमानाच्या ‘या’ आहेत चार प्रिय राशी; कमी वयात होतात श्रीमंत, संकटमोचनच्या कृपेने अडचणी होतात दूर