अभिनेत्री काजोल ही एक अत्यंत आघाडीची अभिनेत्री आहे.. नुकताच तिचा तान्हाजी हा सिनेमाही येऊन गेला.. ज्यातल्या तिच्या भूमिकेचं कौतुक झालं. तिचं करिअर भरात होतं तेव्हा तिने अनेक चित्रपट नाकारलेही.. त्यात ती असती तर? जाणून घ्या काजोलने नाकारलेल्या चित्रपटांविषयी (सर्व फोटो सौजन्य इंस्टाग्राम) -
दिल तो पागल है या सिनेमातली करीश्माची भूमिका म्हणजेच निशाची भूमिका आधी काजोलला ऑफर करण्यात आली होती.. तिने हा रोल नाकारला ज्यानंतर हा सिनेमा करीश्मा कपूरला मिळाला
-
दिलसे या सिनेमात मनिषा कोईरालाचा रोल आधी काजोलला ऑफर झाला होता..
-
चलते चलते सिनेमा आधी ऐश्वर्या राय करणार होती.. तिने हा सिनेमा सोडला.. ज्यानंतर काजोलला या रोलबाबत विचारणा झाली होती
-
खामोशी या सिनेमासाठीही हा काजोलला विचारणा झाली होती.. तिने हा सिनेमा नाकारला.. ज्यानंतर सिनेमात मनिषा कोईरालाची वर्णी लागली
-
मोहब्बते हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला.. यामध्ये ऐश्वर्या रायची भूमिका महत्त्वाची होती.. या भूमिकेसाठी आधी काजोलला विचारणा झाली होती.. मात्र तिने हा चित्रपट नाकारला होता.
-
वीर झारा या सिनेमातल्या झाराच्या भूमिकेसाठी काजोलला पहिली पसंती होती.. मात्र तिने हा सिनेमाही नाकारला
-
शक्ती द पॉवर हा सिनेमा नॉट विदाऊट माय डॉटरचा रिमेक होता.. त्या सिनेमातही करीश्मा कपूरने साकारलेली भूमिकेसाठी आधी काजोलला विचारणा झाली होती
-
थ्री इडियट्स या सिनेमातील करीना कपूरने साकारलेली भूमिकाही लोकांच्या लक्षात आहे.. या भूमिकेसाठी आधी काजोलला विचारणा झाली होती असं म्हणतात
-
काजोलने अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.. मात्र या सिनेमांमधेही ती झळकली असती तर कदाचित या सिनेमांची गणितं काही वेगळी असू शकली असती.

DC vs MI: रोहित शर्माचा एक निर्णय अन् नवा चेंडू ठरला सामन्याचा टर्निंग पॉईंट, डगआऊटमधून हिटमॅन कसा ठरला गेमचेंजर?