-
अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं १४ जून रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतनं वांद्रे येथील राहत्या घरात आत्महत्या केली. ही घटना घडून दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. मात्र, हे प्रकरण मागील काही दिवसांपासून राष्ट्रीय स्तरावरील प्रमुख मुद्दा बनलं आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर अनेकांनी यात शंका उपस्थित केली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. मात्र, बिहारमध्ये सुशांतच्या वडिलांनी गुन्हा दाखल केला आणि या प्रकरणाला नवं वळण मिळालं. (फोटो -इंडियन एक्स्प्रेस)
-
अरुण यादव यांच्या विधानावर भूमिका मांडताना सुशांतचा चुलत भाऊ आणि भाजपाचे आमदार नीरज कुमार सिंह यांनी टीका केली. "राजद आमदारांची मानसिक स्थिती चांगली नाही, त्यामुळे ते काहीही बोलत आहेत. अरुण यादव यांचं तिकीट कापलं जाणार आहे. त्यामुळेच त्यांची मानसिक स्थिती चांगली नाही. याच कारणामुळे ते काहीही बोलत आहेत. जनता त्यांना त्यांच्या वक्तव्यांचा अर्थ समजावून सांगेल," असं नीरज कुमार सिंह म्हणाले.
-
सुशांतसिंहच्या प्रकरणाची चौकशी सुरू केल्यानंतर शुक्रवारी सीबीआयच्या पथकानं सुशांतचा स्वयंपाकी नीरज सिंह याची चौकशी केली. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी तब्बल ५ तास नीरजची चौकशी केली. यावेळी नीरजनं सीबीआयला दिलेली माहिती आणि यापूर्वी मुंबई पोलिसांना दिलेल्या माहितीत साम्य आढळून आलं आहे. नीरज सिंह या प्रकरणातील महत्त्वाची व्यक्ती असून, त्यानं पहिल्यांदा सुशांतला मृत अवस्थेत बघितलं होतं.
-
सीबीआयला नीरज सिंहने दिलेल्या माहिती संदर्भात आजतकनं वृत्त दिलं आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांना नीरजनं दिलेल्या जबाबाची माहिती घेतली. त्यानंतर घटनेसंदर्भात प्रश्न विचारण्यात आले. ५ तास चाललेल्या या चौकशीत नीरजनं तिचं उत्तर दिली, जी यापूर्वी मुंबई पोलिसांना दिली होती.
-
-
रियानं ८ जून रोजी सकाळी नीरज सिंहला फोन करून कपडे बॅगेत ठेवण्यास सांगितलं होतं. नीरजनं चौकशीत सांगितलं की, रियाच्या घर सोडून जाण्याबद्दल ७ जूनपर्यंत त्याला काहीही माहिती नव्हतं.
-
"अभिनेता सुशांत सिंह राजपूत हा राजपूत जातीचा नव्हता. जर तो राजपूत असता तर त्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली नसती. कारम राजपूत महाराणा प्रताप यांच्या वंशज आहे."
-
-
"तो जर राजपूत होता, तर त्यानं सामना करायला हवा होता. राजपूत स्वतः मरण्याआधी समोरच्याला संपवतात. सुशांतनं स्वतः गळफास घेऊन आत्महत्या करायला नको होती," असं अरूण यादव यांनी म्हटलं.
-
नीरज सिंहची चौकशी करण्यापूर्वी सीबीआयच्या पथकानं मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाशी संबंधित सर्व पुरावे ताब्यात घेतले. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत असल्यानं पोलिसांनी अनेकांची चौकशीही केली आहे.

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख