-
'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय विनोदी मालिकांपैकी एक आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
ही मालिका जवळपास गेली १२ वर्ष सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मात्र यामधील काही कलाकार आता हळूहळू मालिका सोडू लागले आहेत. अलिकडेच रोशन सिंह सोधी ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या गुरुचरण सिंह याने मालिकेला रामराम ठोकला होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
त्यानंतर आता अंजली मेहता या भूमिकेत झळकणाऱ्या नेहा मेहता हिने देखील मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
त्यामुळे तिच्या जागी आता प्रसिद्ध अभिनेत्री सुनैना फौजदार अभिनय करताना दिसणार आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सुनैना फौजदार (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
ई टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार तारक मेहताची पत्नी अंजली मेहता या भूमिकेसाठी निर्मात्यांनी सुनैना फौजदार हिची निवड केली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सुनैना येत्या काही काळात मालिकेत अभिनय करताना दिसेल. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मात्र तिची या मालिकेत एण्ट्री कशी होणार? याबाबत निर्मात्यांनी अद्याप काहीही स्पष्ट केलेलं नाही. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
नेहा मेहता गेल्या १२ वर्षांपासून तारक मेहतामध्ये काम करत आहे. मात्र सातत्याने एकच व्यक्तिरेखा साकारुन आता कंटाळली असल्यामुळे तिने मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असं म्हटलं जात आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मात्र नेहाने याबाबत कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सुनैना एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
२००७ साली 'संतान' या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
त्यानंतर 'राईट लेफ्ट राईट', 'मित मिलादे रब्बा', 'हमसे है लाईफ', 'यम है हम' यांसारख्या अनेक विनोदी मालिकेंमध्ये तिने काम केले आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
'सीआयडी' आणि 'अदालत' या क्राईम मिस्ट्री मालिकेंमुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सुनैना आपल्या विनोदी शैलीसाठी प्रसिद्धी आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
त्यामुळेच तिला 'तारक मेहता' सारख्या लोकप्रिय मालिकेत काम करण्याची संधी मिळाली असं म्हटलं जात आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
दरम्यान प्रेक्षक मात्र या नव्या अंजलीला पाहण्यासाठी उत्सुक आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सुनैना फौजदार (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-

Devendra Fadnavis: संतोष देशमुखांचे ‘ते’ छिन्नविछिन्न फोटो कधी पाहिले? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे महत्त्वाचे विधान