-
क्रिकेट आणि ग्लॅमर हे नातं काही चाहत्यांसाठी नवीन नाही. IPL ही तर सर्वाधिक ग्लॅमरचा तडका असलेली क्रिकेटची स्पर्धा मानली जाते.
-
IPLमध्ये अनेक वेळा प्रेक्षकांच्या गराड्यात काही चेहरे कॅमेरावर दिसतात आणि नंतर त्या व्यक्ती अचानक लोकप्रिय होतात.
-
IPLच्या अशाच एका सामन्यात कॅमेरावर दिसलेली 'मिस्ट्री गर्ल' सध्या तुफान चर्चेत आहे. ती IPLच्या अनेक सामन्यांना प्रेक्षकांमध्ये दिसली.
-
तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर टाकलेल्या एका हॉट फोटोमुळे तिची जोरदार चर्चा सुरू आहे.
-
भारतीय संघातील आघाडीचा गोलंदाज आणि टी२० मधील एकमेव भारतीय हॅटट्रिकवीर याची ती सख्खी बहिण आहे.
-
या ग्लॅमरस 'मिस्ट्री गर्ल'चं नाव आहे मालती चहर. भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहर याची मालती सख्खी बहिण आहे.
-
मालती अभिनेत्री आणि मॉडेल आहे. मालती उत्तर प्रदेशची असून महेंद्रसिंग धोनीची चाहती आहे.
-
मालतीने डाबर टूथपेस्टसारख्या बड्या ब्रँड्ससोहत जाहिरातींमध्ये मॉडेलिंग केले आहे.
-
मालतीने नुकतंच ग्लॅमरस फोटोशूट केलं असून त्यातील हा हॉट फोटो काल (२६ ऑगस्ट) इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
-
त्या फोटोला तिने मजेशीर असे कॅप्शनदेखील दिले असून इतर फोटोंप्रमाणेच तो फोटोदेखील चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम / मालती चहर)

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ