1996मध्ये मायकल जॅक्सन मुंबईत आला होता ते फक्त आणि फक्त शिवसेनेमुळे. शिव उद्योग सेनेनं हा कार्यक्रम आयोजित केला होता. सहार विमानतळावर जॅक्सन उतरला तेव्हा त्याच्या स्वागताला राज ठाकरे, शर्मिला ठाकरे आणि सोनाली बेंद्रे उपस्थित होते. सोनालीनं नऊवारी साडी नेसून खास मराठमोळ्या पद्धतीनं मायकल जॅक्सनचं औक्षण करून स्वागत केलं होतं आणि तो त्यामुळे भारावून गेला होता. मायकलच्या कॉन्सर्टआधी त्याची मातोश्रीवरची भेट, त्याचं हॉटेल ओबेरॉयमध्ये उतरणं, फॅन्सना मोकळेपणानं भेटणं सगळंच चर्चेत राहिलं. जॅक्सनला मातोश्रीवर भारतीय वाद्यांची भेट मिळाली होती. -
अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सवर ही काॅन्सर्ट झाली. ही कॉन्सर्ट चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतली होती.
बाॅलिवूडचे सगळे दिग्गज हजर होते. शिव उद्योग सेनेच्या मदतीसाठी हा शो केला गेला. 1996मध्ये आजच्या मानानं सोशल मीडिया प्रभावी नव्हता. त्या काळात व्हाॅटसअप नव्हतं. तरीही मायकल जॅक्सनची काॅन्सर्ट शिवसेनेच्या पुढाकारानं आयोजित केल्यामुळे ती प्रत्येकाच्या उत्सुकतेचा विषय ठरली. मायकल भारतात आला तेव्हा मुंबईत रस्त्यावर दुतर्फा त्याच्या चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. अक्षरशः त्याच्या कारला जायलाही जागा मिळत नव्हती. संपूर्ण जगाला आपल्या तालावर नाचविणारा ‘किंग ऑफ पॉप’ मायकल जॅक्सन हे संगीत क्षेत्रातील एक अजरामर व्यक्तिमत्त्व आहे. २००९ साली अनपेक्षितरीत्या मायकल जॅक्सनचे निधन झाले. त्याचा मृत्यूदेखील रहस्यमयच होता.

Shani Gochar 2025: शनीच्या साडेसाती आणि ढैय्येपासून ५ राशींना मिळणार सुटका, करिअरमध्ये घेणार मोठी झेप, वर्षभर होईल पैशांचा पाऊस