-
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआयमार्फत अभिनेत्री रिया चक्रवर्तीची चौकशी सुरु आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या चौकशीत दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. त्यामुळे सोशल मीडियाद्वारे रियावर सध्या जोरदार टीका होत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
मात्र ही टीका अभिनेत्री सोन्या अयोध्या हिला आवडलेली नाही. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तिने रियाला पाठिंबा देत टीकाकारांवर संताप व्यक्त केला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
"तुम्ही स्वत:ला शेरलॉक होम्स समजता का?" असा सवाल तिने टीकाकारांना केला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत सोन्या अयोध्या हिने सुशांत मृत्यू प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
ती म्हणाली, "अनेक जण पुराव्यांअभावी रिया चक्रवर्तीवर टीका करत आहेत. खरं तर सुशांतच्या मृत्यूपूर्वीच रियाने त्याचा फ्लॅट सोडला होता. या प्रकरणात जर रिया दोषी असेल तर तिला शिक्षा होईलच, पण खरी माहिती समोर येईलपर्यंत उगाचच तिच्याविरोधात अफवा पसरवू नये. या प्रकरणात काही लोक स्वत:ला जणू शेरलॉक होम्स समजत आहेत. त्यांनी सीबीआयला आपली चौकशी करु द्यावी" (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सोन्या अयोध्या एक प्रसिद्ध टीव्ही आभिनेत्री आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
'शक्ती – अस्तित्व के एहसास' की या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
त्यानंतर 'नजर' आणि 'कसौटी झिंदगी की – २' या मालिकांमध्ये ती झळकली होती. सध्या ती सुशांत प्रकरणात रिया चक्रवर्तीला पाठिंबा दिल्यामुळे चर्चेत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील संशयीत आरोपी रिया चक्रवर्तीला अंमली पदार्थविरोधी पथकाने (NCB) अटक केली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अंमली पदार्थ खरेदी व सेवन करण्याच्या आरोपाखाली तिला अटक करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
यापूर्वी रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक आणि सॅम्युअल मिरांडा या दोघांना अंमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली होती. रिया चक्रवर्ती ही कुटुंबातील ही दुसरी अटक आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
या घडामोडीमुळे सुशांतच्या मृत्यूनंतर दोन महिने चौकशी करणाऱ्या मुंबई पोलिसांना अंमलीपदार्थाबाबतचे तपशील का मिळू शकले नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) नोंदवलेल्या गुन्ह्य़ात रियासह शोविक आणि मिरांडा संशयित आरोपी आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल