-
करीना कपूर ही बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रीपैकी एक अभिनेत्री आहे. व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवन वेगवेगळं कसं ठेवावं हे तिला चांगलंच माहिती आहे.
-
करीनाने आपल्या सिनेकारकिर्दीत अनेक वेळा लिपलॉक आणि किसिंग दृश्ये चित्रित केली आहेत. पण अजय देवगणबरोबर किसिंग सीनचं चित्रीकरण करण्यासाठी मात्र तिने नकार दिला होता.
-
अजय देवगणसोबत किसिंग सीन चित्रीत करण्यासाठी करीनाने नकार देऊन बरीच वर्षे झाली, पण त्यामागचं कारण मात्र तिने अलिकडेच उघड केलं.
-
हा संपूर्ण प्रकार २०१३ साली रिलीज झालेल्या प्रकाश झा यांच्या सत्याग्रह चित्रपटाच्या सेटवर झाला होता.
-
सत्याग्रह या चित्रपटात अजय देवगण आणि करीना कपूर हे दोघे प्रियकर-प्रेयसीच्या भूमिकेत होते.
-
चित्रपटाच्या रिलीजच्या काही काळ आधीच करीनाने सैफ अली खानशी लग्नगाठ बांधली होती.
-
सत्याग्रह चित्रपटाचे शूटींग आणि लग्नाची तयारी अशा दोन्ही गोष्टी करीना त्यावेळी सांभाळत होती.
-
लग्नाची तारीख नजीक आलेली असताना कोणतीही विवादास्पद किंवा चर्चांना उत्तेजन देणारी गोष्ट घडू नये असा करीनाचा विचार होता.
-
त्यामुळे तिने त्या चित्रपटात अजय देवगणबरोबर किसिंग दृश्य चित्रित करण्यासाठी नकार दर्शवला होता.
-
करीनाने अजयबरोबर सत्याग्रह चित्रपटाव्यतिरिक्त गोलमाल २, सिंघम २ आणि ओमकारा या चित्रपटातही काम केले.
पुणेकरांचा नादखुळा! भारताच्या दणदणीत विजयानंतर पुण्यात FC रोडवर हजारो क्रिकेट फॅन्सनी काय केलं पाहा; VIDEO झाला व्हायरल