-
माधुरी दीक्षित ही एक यशस्वी अभिनेत्री आहे. तिने केलेले अनेक चित्रपट यशस्वी ठरले आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या सिनेमांची पहिली पसंती होती माधुरी
-
माधुरीने एकाहून एक सरस सिनेमा दिले आहेत.
-
अनेक असे सिनेमा आहेत ज्या सिनेमांची पहिली पसंती होती माधुरी दीक्षित (सर्व फोटो सौजन्य- https://dhumor.in/)
-
डर हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट झाला होता. या सिनेमात जुहीने किरण ही व्यक्तीरेखा साकारली मात्र या सिनेमाची पहिली पसंती होती माधुरी दीक्षित
-
डर या सिनेमाची पहिली चॉईस शाहरुखही नव्हता, आमिर खान, राहुल रॉय यांना या रोलबद्दल विचारणा झाली होती. माधुरी तिच्या शेड्युलमध्ये बिझी असल्याने तिने हा सिनेमा केला नाही जो नंतर जुहीला मिळाला
-
आईना या सिनेमातील जुहीच्या भूमिकेची पहिली पसंती माधुरीच होती. मात्र याहीवेळी सिनेमासाठी माधुरीच्या डेट्स मिळाल्या नाहीत. त्यामुळे हा सिनेमा जुहीला मिळाला. शिवाय या सिनेमाचे स्क्रिप्टही तिला आवडले नव्हते
-
९० च्या दशकात अनिल कपूर आणि माधुरी ही जोडी हिट होती. त्यांनी तेजाब, बेटा यासारखे अेक हिट सिनेमा दिले होते. १९४२ ए लव्ह स्टोरी या सिनेमासाठीही माधुरीला विचारणा झाली होती. मात्र इतर सिनेमांच्या कामात बिझी असल्याने माधुरीने हा सिनेमा नाकारला. ज्यानंतर हा सिनेमा मनिषा कोईरालाला मिळाला.
-
सपने हा दाक्षिणात्य सिनेमाचा रिमेक होता. या लीड रोल होता तो काजोलचा पण या सिनेमासाठीही माधुरी पहिली पसंती होती. तिने हा सिनेमा नाकारला.
-
त्यानंतर काजोलने हा सिनेमा केला. सपने हा काजोलच्या कारकिर्दीतला एक हिट सिनेमा ठरला
-
खामोशी या सिनेमासाठीही संजय लीला भन्साळीची पहिली पसंती माधुरीच होती. मनिषा कोईरालाने साकारलेली भूमिका आधी माधुरीला ऑफर झाली होती मात्र माधुरीने हा सिनेमा नाकारला.
-
हम दिल दे चुके सनम या सिनेमासाठीही पहिली पसंती माधुरीच होती. मात्र माधुरीने हा सिनेमाही सोडला ज्यानंतर ही भूमिका ऐश्वर्या रायने साकारली
-
या सिनेमाने काय इतिहास घडवला ते आपल्याला माहित आहेच. तर हे सिनेमा होते ज्यांची पहिली पसंती होती माधुरी. ती या सिनेमांमध्ये झळकली असती तरीही हे चित्रपट हिट झालेच असते यात शंका नाही.

शनि आणि राहूचा होणार महासंयोग! १८ मे आधी या ४ राशींचे लोक होतील श्रीमंत, यशाच्या शिखरापर्यंत पोहचणार